आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलावरील चार त्रुटींनी घेतला दोन जवानांचा जीव, दोघे २५ फूट खाली कोसळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रांती चौक उड्डान पूल. - छाया : माजिद खान - Divya Marathi
क्रांती चौक उड्डान पूल. - छाया : माजिद खान
औरंगाबाद- क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ ) दोन जवानांचा मृत्यू झाला. गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री ११. ३० वाजता ही घटना घडली. आंध्र प्रदेशातील गुंटूरचे रहिवासी असलेल्या एस. चैतन्य आणि टी. वीरेंद्र (दोघांचे वय २६) अशी मृतांची नावे आहेत. महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाने पुलावर ठेवलेल्या चार त्रुटींमुळे या दोन जवानांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र आणि चैतन्य पल्सर दुचाकीवरून सिडकोकडून बाबा पेट्रोल पंपाकडे जात होते. क्रांती चौक उड्डाणपुलावर येताच पहिल्या गतिरोधकानंतर वीरेेंद्रचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते डाव्या बाजूने थेट उजव्या बाजूकडे भेलकांडले. काही क्षणांतच कठड्यावर आदळून उड्डाणपुलावरून सुमारे २५ फूट खाली कोसळले. मोठा आवाज झाला म्हणून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती क्रांती चौक पोलिस ठाण्याला दिली. तातडीने टू मोबाइल व्हॅन घटनास्थळी पोहोचली. दरम्यान, चैतन्यचा जागीच मृत्यू झाला होता तर वीरेंद्रने घाटीत जीव सोडला. शुक्रवारी पहाटे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सीआसएसएफच्या अधिकाऱ्यांनी या दोघांचे मृतदेह त्यांच्या गावी पाठवले. या घटनेमुळे विमानतळ कर्मचारी आणि सीआयएसएफच्या जवानांवर शोककळा पसरली होती. घटनेची नोंद उस्मानपुरा ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास हवालदार बबन भोसले करत आहेत. अपघाताच्या वेळी गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट घातले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

२०१२ मध्ये झाले होते भरती : विरेंद्रचैतन्य हे दोघेही अतिशय होतकरू होते. २०१२ मध्ये ते सीआयएसमध्ये भरती झाले होते. दोघेही अविवाहित होते. गुरुवारी दोघेही ड्युटीवर होते. तीन वर्षांपासून ते औरंगाबाद विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते.

कठड्याचेहुक वाकले : दुचाकीचीकठड्याला धडक इतकी जोरदार होती की त्यावरील आडव्या खांबाला लावलेले लोखंडी हुक त्यामुळे वाकले. तेथे पोहोचण्यापूर्वी दुचाकी सुमारे सात फूट अलीकडे घासली गेली होती.

दुसराबळी... : १५ऑक्टोबर रोजी दुचाकीवर मागे बसलेल्या समीर पेडगावकर या युवकाचा दुचाकी गतिरोधकावरून उसळल्याने खाली पडून मृत्यू झाला होता. त्याची दखल महामंडळाने घेऊन रेडिअम पट्ट्यांची गतिरोधक बदलण्याची व्यवस्था केली नाही. अनेक महिन्यांपासून पुलावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचे थर साचले आहेत. रात्री उशीरा खासगी बसेस आणि जड वाहने उड्डाणपुलावर भरधाव वेगाने धावतात. त्यावेळी दुचाकीस्वार कठड्याकडे सरकतात आणि मातीत चाक अडकून दुचाकी घसरते. त्याकडे मनपानेही लक्ष दिलेले नाही.
मातीचेढिगारे उचला नाही तर : पुलावरीलमातीचे ढिगारे उचलण्यासंदर्भात महापालिकेने तत्काळ पावले उचलली नाही तर सामाजिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’कडून करण्यात आले आहे.

वेगावरनियंत्रण ठेवा :पुलावरुन जातानावेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. क्रांती चौकाच्या उड्डाणपुलावर अपघात झालेल्या ठिकाणी प्रती तास २५ किलोमीटर वेग ठेवा, अशी सूचना करणारा फलक आहे. मात्र, वाहक त्याकडे दुर्लक्ष करतात.
पुढील स्यालाइड्सवर वाचा, काय आहेत त्रुटी...
बातम्या आणखी आहेत...