आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तरुणींची अात्महत्या, हर्सूल आणि देवळाई भागातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुम्बिनी मोरे - Divya Marathi
लुम्बिनी मोरे
औरंगाबाद- शहरातीलदोन तरुणींनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केली. एका तरुणीने आईशी नेहमी वाद होत असल्याच्या कारणावरून तर दुसरीने मनाविरुद्ध लग्न लावले जात असल्याच्या कारणावरून आत्महत्या केली. यातील एक तरुणी उच्चशिक्षित आहे तर दुसरी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. नवरात्रोत्सवातच तरुणींनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहिली घटना-
हर्सूल तलावात आढळला मृतदेह
हर्सूलयेथील लुम्बिनी सुनील मोरे (१९) शनिवारपासून (१८ ऑक्टोबर) बेपत्ता होती. पोलिस तिचा शोध घेत असताना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हर्सूल तलावात तिचा मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक वसीम हाशमी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार आणि पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह काढला. लुम्बिनीचे वडील मजुरी करतात. आई एका कंपनीत नोकरी करते. लुम्बिनीदेखील एका कंपनीत नोकरी करत होती. मात्र तिने (लिंबोणी) नोकरी करू नये, या कारणावरून मायलेकीत भांडण झाल्याने ती शनिवारी घर सोडून निघून गेली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, लग्नाच्या कारणावरून केली मुलीने आत्म हत्या