आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजला ए. एस. क्लब चौकात बस आणि ट्रकची धडक; चौघे जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ए. एस. क्लब चौकात पुणे-जळगाव खासगी बसला बुधवारी भल्या पहाटे वाजेच्या सुमारास (एच. एच. १९ वाय. ७२००) शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रकची (एमएच 20 डी एस 5486) जोरदार धडक बसली. यात बसचा चालक विजय पाटील, क्लिनर मनोज निंबाळकर तसेच ट्रकचा चालक मोबीन इनामदार आणि क्निनर किरकोळ जखमी झाले.
जखमीवर वाळूजच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या वेळी बसमध्ये २५ प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. चिकलठाणा एमआयडीसी येथील नवकार पेपर मिल येथून पेपर रोल घेऊन निघालेला हा ट्रक होता. अपघातामुळे ट्रक पलटी झाला.
छाया : धनंजय दारुंटे