आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीविरोधात व्यापार्‍यांचा 21 तारखेला बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील एलबीटी भरणारे व्यापारी येत्या 21 फेब्रुवारी रोजी एलबीटीविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व जीएसटीची प्रणाली लागू करण्यासाठी एक दिवसांचा बंद पुकारणार आहेत.एलबीटी रद्द करावा, या मागणीसाठी 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर राज्यातील व्यापार्‍यांची महासभा होणार असून त्यात जिल्हा व्यापारी महासंघही सहभागी होत आहे. याच दिवशी औरंगाबादचे व्यापारी बंद पुकारणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी दिली. छाबडा म्हणाले, राज्यात फक्त औरंगाबादेत एलबीटी व्यापार्‍यांच्या सहकार्याने सुरू आहे.

त्यावेळी शासनाने व्यापार्‍यांना जीएसटी लागू झाल्यावर एलबीटी संपेल, असे आश्वासन दिले होते, पण तीन वर्षे उलटल्यावरही सरकार जीएसटी प्रणाली अमलात आणू शकलेली नाही. बैठकीला मदनभाई जालनावाला, दीपक पहाडे, संजय कांकरिया, लक्ष्मीनारायण राठी, गोपालभाई पटेल, राजन हौजवाला, कचरू वेळंजकर, नीरज पाटणी, मुकेश अग्रवाल, मनोज राठी, राजकुमार जैन उपस्थित होते.