आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traditional Election Propoganda Items Selling Decline

पारंपरिक प्रचार साहित्य विक्रीला ब्रेक, शहरात व्यापा-यांचा दैनंदिन खर्चही निघणे अवघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने इच्छुकांनी पारंपरिक प्रचार साहित्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या व्यवसायातील लोक अडचणीत सापडले आहेत. दुकान भाडे, वीज बिल, प्रवास, कर्मचा-यांवरील दैनंदिन खर्च निघणेही अवघड झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीदरम्यान कर्मचा-यांचा पगार व इतर खर्च पकडला, तर व्यापा-यांना ४० हजार रुपये लागतात; पण व्यापा-यांना हा खर्च निघणेही कठीण वाटत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही अशीच परिस्थिती होती. किमान मनपा निवडणुकीत तरी साहित्य विकले जाईल, असे वाटत होते, पण सध्यातरी याला कमी प्रतिसाद असल्याचे लक्ष्मण माळवदे यांनी सांगितले. शहरात क्रांती चौक ते पैठण गेटदरम्यान प्रचार साहित्याची पाच दुकाने आहेत, तर गुलमंडी, टीव्ही सेंटर, सूतगिरणी आदी ठिकाणीही दुकाने आहेत. जालना, नागपूर, नाशिक या राज्यातील व्यावसायिकांसह परराज्यातील जबलपूर, दिल्ली, जयपूर येथील व्यापारी शहरात दाखल झाले आहेत. गेल्या विधानसभेत सर्व पक्ष वेगवेगळे लढले असल्याने व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार साहित्याचा माल आणला होता. मात्र, या साहित्याच्या मागणीत कमालीची घट झाल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. प्रचार सभेला, रॅलीला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही. उमेदवारांमध्ये केवळ पाच-पन्नास कार्यकर्ते दिसतात. त्यांनाही हातात झेंडे घेऊन प्रचार करणे पसंत नसते. कार्यकर्तेच घराबाहेर पडण्यासाठी तयार नसल्याने झेंडे, स्टिकर आदी वस्तू घ्यायच्या तरी कोणासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विक्री घटण्याची कारणे
*आचारसंहितेच्या नियमांचा अडथळा
*सोशल मीडियाचा वापर
*पक्षांकडे कार्यकर्त्यांची कमतरता
*रॅली झाल्यावर साहित्य जमा करून पुन्हा वापरणे