आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारंपरिक डिझाइनच्या पर्सला महिलांची पसंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महिलांच्या पर्समध्ये काळानुरूप बदल होताना दिसून येत असले, तरी आता पुन्हा पारंपरिक डिझाइनच्या पर्स घेणे महिला पसंत करत आहेत. यात वारली डिझाइन्स, प्लेन रंग, फुलांच्या डिझाइन्सला, बरकत, स्पेक्स यांना मोठी मागणी आहे. पूर्वीचा पोतडी प्रकार हा आता झोला नावाने नावारूपास आला आहे. झोला घेण्याकडे तरुणी आकर्षित होत आहे.
पैसे ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या छोट्या पर्समध्ये दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहे. पार्टी आणि लग्न सोहळ्यात वापरणारा कल्चर, तर नोकरदार महिलांसाठी मोठय़ा आकाराची हँड पर्स, तरुणीसाठी पोतडी बॅगचा वापर केला जातो.
वेगवेगळ्या मटेरिअलमधील बॅग्ज सध्या बाजारात आल्या आहेत. यात रेक्झिन, कॉटन, लेदर, कॅमल लेदर, क्रश, ज्युट, वेलवेट आदी प्रकारात बॅग्ज बाजारात आल्या आहेत. चौकोनी, त्रिकोणी, आयताकृती, लहान मोठय़ा आकाराच्या बॅग बाजारात आल्या आहेत. यातही आपल्या आवडीनुसार लहान मोठय़ा आकारात, रंगांत आपण खरेदी करू शकतो. ड्रेसच्या मॅचिंगनुसार वेगवेगळ्या रंगात बॅग्ज आल्या आहेत. यात हँड पर्स, बँगल बॉक्स, पासपोर्ट ठेवण्यासाठी एक वेगळी पर्स आहे. ट्विन्स आकारात, फोल्डर आकारात आवडीनुसार डिझाइन्सनुसार आल्या आहेत. याप्रकारातील लहान आकारातील बँग्ज 10 रुपयांपासून सुरू होऊन मोठय़ा आकारातील बँग्ज या 3000 रुपयांपर्यंत आहेत.
शांतिनिकेतन बॅगला पसंती - बॅगमध्ये शांतिनिकेतन हा नवीन प्रकर आला आहे. यात वारली डिझाइन्स करण्यात आली असून कॅमल लेदरचा वापर करून तयार केले आहे. तसेच कोलकाता पॅटर्नमधील बॅगला मोठी मागणी आहे. शांतिनिकेतन पॅटर्न 250 रुपयांपासून सुरू आहे, तर कोलकाता पॅटर्न 200 रुपयांपासून सुरू आहे.विशेष म्हणजे या बॅग हँडमेंड आहेत. शांतिनिकेतन बॅग्ज हा नवीन प्रकार असल्यामुळे महिला या बॅग्जला पसंती देत आहेत.’’ एम. बी. जसीम, विक्रेता
शांतिनिकेतन बँग्ज चांगल्या आहेत. नवीन आणि वेगळा प्रकार आहे तसेच किंमतही वाजवी आहे.’’ मंगला वैष्णव