आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेसाठी कटिबद्धता आवश्यक - संजयकुमार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रस्ता सुरक्षा आणि औद्योगिक सुरक्षा यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण आणि जाणीव जागृती गरज आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी बुधवारी येथे केले. मराठवाडा अ‍ॅक्शन सेंटर ऑफ नॅशनल सेफ्टी कौन्सिल, मराठवाडा चॅप्टर आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते.
शहरात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे सांगत त्यांनी मागील वर्षात 160 लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याविषयी योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेसाठी परिसंवादात विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. हॉटेल अज्ािंठा-अ‍ॅम्बेसेडर येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या वेळी ग्रीन बुक या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक बी. एन. कळसकर, सचिव मिलिंद सागंवीकर, विजय कुलकर्णी, अविनाश करमतकर, संजीवन जोशी, के. एम. मिस्त्री आणि मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. मिलिंद सांगवीकर यांनी परिसंवादाची रूपरेषा आणि परिषदेच्या कार्याची माहिती दिली. औद्योगिक क्षेत्रात सातत्याने मॉक ड्रील आणि ट्रेनिंगचे आयोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्ही. एस कळसकर यांनी जिल्ह्यात विविध रासायनिक आणि यांत्रिकी उत्पादन करणारे 1160 कारखाने असून या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाबद्दल व्यापक जनजागृतीची गरज व्यक्त केली. यामध्ये 21 अतिधोकादायक कारखाने असल्याने कामगारांना सुरक्षेविषयी जागृत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. वाळूज, पंढरपूर, चिकलठाणा, शेंद्रा येथील अनेक कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या परिसंवादाला उपस्थित होते.