आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डय़ामुळे घाटात अडकले 60 टनी कंटेनर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - अजिंठा घाट चढताना खड्डय़ामुळे अजस्र कंटेनरची क्लच प्लेट तुटली. घाटाच्या वळणावरच 60 टनी कंटेनर अडकल्याने औरंगाबाद-जळगाव मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजता घडली. या वेळी घाटाच्या दोन्ही बाजुंनी दोन किमीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. फर्दापूरकडून येणारी वाहतूक अजिंठा टी पॉइंटवर रोखण्यात आली होती.

दिल्लीहून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे 60 टनांचे मशीन घेऊन ओडिशाकडे निघालेले कंटेनर (एमएच 46 एच 3599) सोमवारी घाटात अडकले होते. रस्त्यावरील खड्डय़ामुळे कंटेनरची क्लच प्लेट निकामी झाल्याने कंटेनर वळणारवच अडकले. या वेळी घाटाच्या दुतर्फा दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी फर्दापूर येथे वाहने थांबवली, तर अजिंठा पोलिसांनी वाहतूक बसस्थानकावरच थांबवली. एका ट्रकच्या साहाय्याने हे अवजड कंटेनर घाटातील रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.

दरम्यान, औरंगाबादहून सिल्लोड मार्गे येणारी वाहतूक अजिंठा बसस्थानकावर थांबवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यामुळे स्थानिक फळ विक्रेते व हॉटेलचालकांचे चांगलेच फावले होते. काहींनी तर घाटात जाऊन केळी, भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, बिस्किटे आदी साहित्य दामदुपटीने विकून नफा कमावला.

संशयास्पद गाडीची चौकशी : मध्य प्रदेश पासिंगची झायलो व्हीआयपी (एमपी 12 बीसी 0887) गाडीतून दुर्गंधी येत होती. सोयगाव पोलिसांनी ती गाडी बाजूला नेऊन चौकशी केली. मात्र, काहीही निष्पन्न झाले नाही.

घाटात मदतकार्य हवे: अजिंठा घाट पाच किमीचा आहे. या घाटातून अवजड वाहनांमुळे एका बाजूची वाहतूक बंद होते. यामुळे एका ठिकाणी वाहतूक पोलिसांची चौकी असावी. जेणेकरून वाहतूक ठप्प होणार नाही.