आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडथळा करणाऱ्या वाहनांवर अखेर विशेष पथकाकडून गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - पंढरपूर येथील तिरंगा चौकात होणारी वाहतूक कोंडी, अवैध वाहतूक, खासगी वाहनधारकांची दादागिरी हे प्रकार नेहमीच सुरू असतात. त्याकडे स्थानिक पोलिस प्रशासनासोबतच वाहतूक पोलिस हितसंबंध जपण्याकरिता सदरील प्रकाराकडे दुर्लक्ष करत होते. त्यातच, मंगळवारी (११ नोव्हेंबर) पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाने रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर गुन्हा दाखल केला.

विशेष पथकाने केलेल्या या कारवाई मुळे जो अडथळा विशेष पथकाच्या निदर्शनास आला, तो परिसरात नियमित कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाच्या नजरेत कसा आला नाही? असा प्रश्न विचारत परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांनी अाश्चर्य व्यक्त केले आहे.

विशेष पथकाची कारवाई : पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाच्या पाहणीमध्ये मंगळवारी (११ नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तिरंगा चौकात अॅपेरिक्षा (एमएच २० टी ४९०७) बेशिस्तपणे रस्त्यामध्ये उभी केलेली आढळून आली. सदरील रिक्षाचालक चंदू कचरू दणके (२८, रा. साठेनगर, वाळूज) याच्यावर सदरील पथकातील साधना परळीकर यांच्या िफर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार एसबी सानप करत आहेत.

औरंगाबाद-नगर महामार्गावरील तिरंगा चौकात अवैध वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनधारकांकडून रहदारीस नेहमीच अडथळा निर्माण होत असतो. उल्लेखनीय बाब म्हणजे वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत सदरील चौकात रस्त्याच्या अर्ध्यापर्यंत वाहने उभी करून क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवण्याचा प्रकार पोलिसांच्या सुरू असतो. याचा नाहक त्रास औद्योगिक परिसरातून ये-जा करणाऱ्या रहिवासी नागरिकांसह उद्योजकांना सहन करावा लागतो.
तिरंगा चौकात अतिक्रमण
कारखान्यांतून तयार होणाऱ्या मालासह कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अवजड वाहनांना तिरंगा चौकातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. त्यातच फळ-भाजी विक्रेते, चहापानाच्या टपऱ्या रस्त्याच्या अर्ध्यावर उभा करण्यात येणारी खासगी वाहनांची वर्दळ यामुळे सदरील चौक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. परिणामी या चौकात नेहमीच लहान-मोठे अपघात होतात.
प्रमाण कमी-अधिक
वाहतूक शाखेकडूनही रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. सदरील चौकातही कारवाई करण्यात येते. मात्र, प्रमाण कमी-अधिक असू शकते.
अजित बोऱ्हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा