आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फॅन्सी नंबर प्लेट तसेच विनाक्रमांकाच्या वाहनांवर सोमवारपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली. शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
शहर पोलिस आयुक्तालयामार्फत वाहतूक शाखेच्या अंतर्गत सदरील मोहीम आठ दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. शहरातील अनेक दुचाकी, चारचाकी वाहने विनाक्रमांकाची असल्याने चोरीच्या घटनांत त्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळसूत्र चोरीच्या घटनेत अनेकदा विनाक्रमांकाची वाहने वापरली जात असल्यामुळे आरोपींचा शोध घेणे कठीण जाते. अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर टाकण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे सदरील कारवाई सुरू करण्यात आली अाहे. सदरील मोहीम प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौकात नाकाबंदी करून वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील.
वाहतूक शाखेच्या वतीने दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. तेव्हा एका तरुणाने राजकीय नेत्याला फोन लावला. मात्र पोलिसांनी त्याला जुमानता दंड वसूल केला.