आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिस्त लावणार्‍या पोलिसांचीच वाहने ‘नो पार्किंग’मध्ये उभी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- पंढरपूरलगतच्या तिरंगा चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या चौकात वाहनांना शिस्त लावण्यासाठी पोलिस दररोज कारवाई करतात. मात्र, वाहनचालकांना शिस्त लावताना पोलिसांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.

तिरंगा चौकात अपघातांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्योजकांनी ‘मसिआ’ संघटनेच्या वतीने अडथळा मुक्त रस्ते करण्याची मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे केली. त्यावर विचार क रून परिसरातील मार्गावरील वाहतूक बेटांमध्ये सुधारणा करण्याचा तर काही बेटे पूर्णत: क ाढण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. मात्र, दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचे धडे देणार्‍या वाहतूक पोलिसांकडूनच तिरंगा चौकात रस्त्यावर वाहने उभे करून नियम मोडण्याचा प्रकार सुरू आहे. तिरंगा चौकातून नगर व एमआयडीसीतील कारखान्यांकडे जाणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. सायंकाळी कामगारांना सुटी झाल्यानंतर गर्दीत भर पडते.

नो पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या : वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बेशिस्त चालकांना दंड करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून केले जाते. मात्र, याच पोलिस कर्मचार्‍यांची दुचाकी वाहने नो पार्किंगच्या ठिकाणी उभी केली जातात.

नियम तोडणारे पोलिस सीसीटीव्हीत कैद : तिरंगा चौकात हायमास्ट दिव्यांच्या खांबावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याच खांबाखाली वाहतूक पोलिसांच्या दुचाकी लावल्या जातात. पोलिसही तेथेच उभे असतात. पोलिसांच्या वाहनांमुळेच वाहतुकीला अडचण निर्माण होते. त्यांना कधीही अधिकार्‍यांनी जाब विचारण्याची तसदी घेतली नाही. खांबावरील सीसीटीव्हीद्वारे टिपले जाणारे चित्रण अधिकारी कार्यालयात बसून पाहू शकतात. त्यासोबतच मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरूनही ते बसल्या ठिकाणाहून चौकांवर नजर ठेवतात. मात्र त्यांनी या पोलिस कर्मचार्‍यांकडे लक्ष का दिले नाही, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

वाहन इतरत्र लावण्याची ताकीद देणार
अनेक वेळा बेशिस्त वाहनचालकांची वाहने कारवाईनंतर त्याठिकाणी उभी केली जातात; परंतु काही कर्मचारी स्वत:ची वाहने उभी क रून वाहतूक कोंडीत भर टाकत असतील, तर त्यांनी यापुढे वाहने उभी करून अडथळा निर्माण न करण्याची ताकीद दिली जाईल. बी. डब्ल्यू. मोरे, पोलिस निरीक्षक, छावणी वाहतूक शाखा