आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सैनिकांना मिळाले पोलिसांचे जाकीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या माजी सैनिकांना पोलिसांनी सात जाकिटे पुरवली असून शहरातील कुठल्या चौकात वाहतुकीचे नियमन करणार याची माहिती वाहतूक विभागाला देऊन मदत करण्यास प्रारंभ करण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या आहेत.
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी एसबीआय चौकात वाहतुकीचे नियमन करण्यात आले. पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आयुक्तांनीही त्यांची भूमिका गंभीरतेने घेत त्यांना वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे नियमन करण्याची परवानगी दिली. माजी सैनिकांची बैठक सहायक पोलिस आयुक्त अजित बोऱ्हाडे यांच्यासमवेत झाली. त्यांनी माजी सैनिकांना वाहतूक पोलिसांसाठीची जाकिटे दिली. ज्या चौकात नियमन करणार त्यासंबंधीची माहिती वाहतूक विभागास कळवावी, असे सुचित करण्यात आले. माजी सैनिकांनी शनिवारी अभिनय टॉकीजशेजारील चौकात वाहतुकीचे नियमन केले. याप्रसंगी मेजर चंद्रसेन कुलथे, सचिव प्रकाश कुलकर्णी, रामदास माळकर, विष्णू गोरोडे, विजय गोरे, राऊत, सुरळकर आदींची उपस्थिती होती.