आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद ट्रॅफिक पोलिसांकडून युवकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, ही आहे घटनेची दुसरी बाजू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील ट्रॅफिक पोलिसांकडून एका तरुणाला भर रस्त्यावर मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलिसांना कथितरीत्या अरेरावी करणाऱ्या बाईकस्वाराला 2 ते 3 टॅफिक पोलिस चक्क लोळवून लाथा-बुक्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हा युवक ट्रिपल सीट जात होता.
 
विना हेलमेट ट्रिपल सीट होते तरुण
ही घटना मंगळवारी आकाशवाणी चौकात घडली आहे. ग्रामीण भागातून आलेली मुले आकाशवाणी चौक परिसरात बाइकवर ट्रिपल सीट जात होते. यावेली पोलिसांनी त्यांना हेलमेटसाठी अडवले. पोलिसांनी थांबवताच दुचाकी चालवणाऱ्या या मुलाने अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्याप्रमाणे, त्याच्या सोबतचे दोन मुले पोलिस जमा होत असल्याचे पाहता घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना शिवीगाळ करून त्याने हाथ उगारला. त्याचवेळी ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण सुरू केली.
 
खिशात निघाले फक्त 35 रुपये, वाहन जप्त
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणाला जवाहर नगर पोलिस स्टेशनला नेण्यात आले. तरुणाची चौकशी केली असता त्याच्या खिशात फक्त 35 रुपये निघाले. यानंतर पोलिसांनी सदर बाइक जप्त करून त्याला कोर्टाची नोटीस बजावून सोडून दिले. कारण कोणतेही असो पोलिसांनी कायदा हातात घेऊन नागरिकांना अशा प्रकारच्या मारहाणीचे समर्थन मुळीच करता येणार नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा... मारहाणीचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...