औरंगाबाद - हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथे भद्रा मारुती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातून तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे औरंगाबादकडून खुलताबादकडे जाणाऱ्या कन्नडहून औरंगाबादकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. औरंगाबादहून कन्नडकडे जाणारी सर्व जड वाहने दौलताबाद टी पॉइंट येथून आनंद ढाबा, कसाबखेडा मार्गे कन्नडला जातील याच मार्गाने औरंगाबादकडे जड वाहनांना यावे लागेल. ही व्यवस्था २१ एप्रिल रोजी रात्री वाजेपासून ते २३ एप्रिल रोजी सकाळी वाजेपर्यंत लागू राहील.