आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेटस्वाराने मारला मुलींना कट, त्या निघाल्या पोलिस कॉन्स्टेबल; वाचा, पुढे काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मध्यरात्री गस्तीवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करत त्यांच्या वाहनाला कट मारण्याचा प्रकार तरुणाच्या अंगलट आला. या तरुणाला पोलिसांनी पकडून त्याची धुलाई केली. हा प्रकार पोलिस आयुक्तांच्या कानावर पडताच त्यांनी युवकाची दुचाकी खराब होईपर्यंत पोलिसांनी ताब्यात ठेवावी, असे सक्त आदेश दिले. मुस्तकीन कुरेशी ऊर्फ मुज्जफ्फर (रा. सिल्लेखाना) असे आरोपीचे नाव आहे.
क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारच्या रात्री पोलिस नियंत्रण कक्षातील चार महिला पोलिस कर्मचारी पीसीआर व्हॅनसह गस्तीवर होत्या. दोन वाजेच्या सुमारास बुलेट दुचाकीस्वार (एम एच - २० - बी झेड - ५५५१) मुस्तकीनने सिल्लेखाना, पैठण गेट, निराला बाजार, औरंगपुरापर्यंत महिला पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत वाहनाला कट मारून पुढे निघून गेला. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु दुचाकी वळवून तो पुन्हा सिल्लेखान्यातील गल्लीबोळात शिरला. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या दुचाकीचा क्रमांक टिपून घडला प्रकार नियंत्रण कक्षाला कळवला. उपनिरीक्षक कुरुंदकर यांनी शोध घेऊन मुस्तकीनला ताब्यात घेतले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई करून सोडून दिले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या आयुक्त काय म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...