आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत बालिकेचा विनयभंग, 60 वर्षीय व्यक्तीला शिक्षा, पीडितेला दहा हजार रुपये भरपाई देण्याचेही अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- रेल्वेतून प्रवास करणाऱ्या १० वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भुसावळ रेल्वे न्यायालयाने दिल्ली येथील  ६० वर्षीय आरोपीला शुक्रवारी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच पीडित बालिकेला १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायाधीश राहुल थाेरात यांनी दिले अाहेत.    
 
दिल्लीतील महिला १० वर्षीय मुलगी आणि आठवर्षीय मुलासोबत ११ जानेवारी २००८ रोजी गाेवा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करत होती. मनमाड ते भुसावळ या स्थानकांदरम्यान सदर महिलेची व अाराेपी सहप्रवासी अरविंद केशरीलाल वार्ष्णेय (वय ६०, रा. गाझियाबाद, ह.मु. दिल्ली) याची अाेळख झाली. वैदिक गणित शिकवण्याचा बहाणा करून त्याने या महिलेच्या दोन्ही मुलांना बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये नेले.
 
 काही वेळाने मुलगा परत आला. त्यानंतर पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत धावतच अाईजवळ अाली. सोबत असलेल्या अंकलने वाईट वागणूक दिल्याचा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. हा प्रकार पीडितेच्या आईने तिकीट निरीक्षकाच्या कानावर घातला. तसेच महिलेने आरोपीला गाडीतच जाब विचारला.   गाडी दिल्लीला पाेहोचल्यावर महिलेने मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद दिल्ली पाेलिसांकडे दिली. त्यावरून दिल्लीत अरविंद वार्ष्णेय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 
दिल्ली पाेलिसांनी संशयिताला अटक केली, त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली होती. दिल्लीहून हा गुन्हा भुसावळ लाेहमार्ग पाेलिसांकडे वर्ग करण्यात अाला हाेता. भुसावळ लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर सहायक फाैजदार प्रल्हाद देठे यांनी तपास केला.
 भुसावळ रेल्वे न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले.
 
अत्याचारग्रस्त मुलीची इनकॅमेरा साक्ष नाेंदवण्यात अाली. पीडितेची अाई, गाडीतील तिकीट निरीक्षक अप्पासाहेब जाधव व तपासाधिकारी देठे यांचीही साक्ष नाेंदवण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. सुभाष कासार यांनी काम पाहिले. दाेन्ही बाजूंचे युक्तिवाद एेकून तसेच पीडितेची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश राहुल थाेरात यांनी शुक्रवारी अाराेपीला शिक्षा ठाेठावली.   
 
नऊ वर्षांनी निकाल  
अाराेपी अरविंद वार्ष्णेय याला दाेषी ठरवून दाेन वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा ठाेठावली. शिक्षा सुनावताच जीअारपी पाेलिसांनी अाराेपीला ताब्यात घेतले. घटना घडली त्या वेळी अाराेपीचे वय ५१ वर्षे हाेते. अाता अाराेपीचे वय ६० अाहे. आरोपीसोबत त्याची पत्नीदेखील न्यायालयात हजर होती. प्रकरण २००८ मध्ये घडले हाेते. तब्बल नऊ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला.
बातम्या आणखी आहेत...