आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीसाठी प्रशिक्षण हवेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करणे हेच मुख्य या लेखाचे कारण आहे. आपण जसे नोकरी व्यवसायासाठी शिक्षण घेतो. ट्रेनिंग घेतो तसेच ते सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. तसाच संपूर्ण जीवन सुखमय, अनुभव संपन्न व आर्थिकदृष्ट्या भरभराटीचे जावो, हा ही एक उद्देश असतो. आजकालच्या जीवनात आर्थिक यशाचे गणित बरेच गुंतागुंतीचे झाले आहे. शिक्षणाच्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाहीत आणि व्यवसायासाठी आर्थिक सबलता अत्यावश्यक ठरत आहेत.

आपली गुंतवणूक आपणच कोठे करावी? का करावी? लाभ कसा मिळवावा? निश्चित कालावधीमध्ये काही ठेस फायदा मिळवता येईल, अशी व्यवस्था करता येईल का? जमीन, प्लाॅट, फ्लॅट, सोने, बँकेतील मुदत ठेव यापेक्षा लाभदायक गुंतवणुकीचा काही पर्याय उपलब्ध आहे? केवळ पर्याय उपलब्ध असण्यापेक्षा तो सुरक्षित आहे का? त्यासाठी काही प्रशिक्षण आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. व्यापार - नोकरी करून मिळवलेला पैसा सुरक्षितरीत्या वाढवता येईल, असे प्रशिक्षण देणाऱ्या काही व्यक्ती, संस्था महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. ज्या गुंवणूकदारांना ठोस प्रशिक्षण देऊन त्यांची गुंतवणूक साडेतीन ते चार वर्षांत दुप्पट करण्याचे प्रशिक्षण सर्व जोखीम व गुंतवणुकीचे व्यवस्थापन शिकवतात. तसेच काही संस्था मोठ्या गुंतवणूकदारांना १२ वर्षात १२ पट रक्कम हमखास होऊ शकतील, असेही प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये म्हणजे ही रक्कम आपल्याच खात्यात ठेवून आपणच वाढवू शकतो. असे हे प्रशिक्षण घेऊन अतिशय संयमाने प्रशिक्षणातील नियम पाळून आपण आपली गुंतवणूक वाढवू शकतो. सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी प्रशिक्षण हा एक आवश्यक संस्कार आहे. ( लेखक हे आर्थिक क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)