आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Transgender Murdered, Incident At Bhangasimata Fort

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृतीयपंथीयाचा खून, भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी घडलेली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तृतीय पंथीयाचा मृतदेह अॅम्बुलन्समध्ये टाकताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
तृतीय पंथीयाचा मृतदेह अॅम्बुलन्समध्ये टाकताना पोलिस कर्मचारी.
वाळूज - वाळूज एमआयडीसीलगतच्या भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेतमळ्यात तृतीयपंथीयाचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. संभ्या ऊर्फ सखी (३४, रा. बजाज गेट, वाळूज) असे त्याचे नाव आहे. भांगसीमाता गडालगतच्या पडीक शेतात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस िनरीक्षक इंदलसिंग बहुरे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले असता तिथे संभ्या ऊर्फ सखी याचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आल्याचे आणि त्याला लाकडी दांडक्याने मारल्याचे आढळून अाले. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडलेला होता.
साकाेळलेल्या रक्तावरून खुनाची ही घटना एक दिवसापूर्वी घडली असण्याची शक्यता पोलिस निरीक्षक बहुरे यांनी वर्तवली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळावरून रक्ताने माखलेली माती, लाकडी दांडके पोलिसांनी जप्त केले. तपासासंदर्भात पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावेही घटनास्थळी आढळून अाले. या घटनेसंदर्भात खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.