आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारदर्शकता आणल्यामुळे चांगला दर मिळाला: कुलगुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्च आणि एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला गतवर्षीच्या तुलनेत आमराईचे पाचपट उत्पन्न मिळाले. मागील वर्षी अवकाळी गारपिटीचे संकट नसताना फक्त ८९ हजारांची आमराई विक्री झाली. आता मात्र यामध्ये पाचपट वाढ होऊन लाख ८० हजारांपर्यंत घसघशीत कमाई झाली. ‘दिव्य मराठी’ने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना या चमत्काराचे कारण विचारले असता लिलावातील पारदर्शकतेमुळेच उत्पन्न वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिसर विकास योजनेंतर्गत विद्यापीठात १५० एकर क्षेत्रात हजार २३० विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. चिंच, आंबा, चिकू, आवळा सीताफळ आदी झाडांचा लागवडीमध्ये समावेश आहे. यात आंब्याची हूर, लंगडा, हापूस पायरी आदी प्रजातींचे १३२५ झाडे आहेत. यापैकी निम्म्या झाडांनाच यंदा फळे लागली आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आमराईला बसला. त्यामुळे दरवर्षी पाचशे झाडांना आंबा लगडण्याऐवजी यंदा फक्त दोनशे झाडांनाच आंबा पिकला. मागील वर्षीच्या तुलनेत नुकसान होऊनही यंदा उत्पन्नात पाचपटींची वाढ झाल्याचे कुलगुरूंनी सांगितले. गतवर्षी फळे येणाऱ्या बहुतांश सर्व पाचशे झाडांना फळे लगडली तरीही एकूण उत्पन्न फक्त ८९ हजार रुपयेच दाखवण्यात आले होते. यंदा मात्र कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विविध कृषी विद्यापीठांशी संपर्क करून ‘स्ट्राँग’ होमवर्क करून घेतले होते. शिवाय कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सूचनेने समिती स्थापन केली होती. वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन यांच्यासह काही अधिकार मंडळावरील सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला होता.
समितीमार्फत पारदर्शकता आणून शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता लिलाव सुरू करण्यात आला. लिलावात सतरा बागवानांनी भाग घेतला होता.
आंतरपीक घेऊन, रोपवाटिका करू
जूनपासून फळबागांचे रोपे पुरवणारी नर्सरी सुरू करू. डाळिंबांच्या झाडांमध्ये कमवा शिका योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत फळबाग नर्सरी विकसित करण्यात येईल. त्यासाठी अतिरिक्त जमिनीचीही गरज भासणार नाही. डाळिंब पिकांच्या मधल्या भागात आंतरपीक घेऊन रोपे तयार करू. ही रोपे फक्त आंब्यांची राहणार असून व्यावसायिक पातळीवर विक्री करण्यात येईल. विद्यापीठाचे वातावरण प्रदूषणमुक्त असल्यामुळे येथील फळांची रोपे अधिक प्रमाणात विक्री होऊ शकतात. डॉ.बी. ए. चोपडे, कुलगुरू
६१ लाख हजारांची बोली
विद्यापीठपरिसर विकास समितीच्या अंतर्गत फळझाडांची सर्वाधिक बोली छोटू शेख यांनी लाख ६१ हजारांची लावली, तर विद्यार्थी कल्याण संचालक कार्यालय अंतर्गतच्या ९० झाडांना तब्बल लाख २१ हजारांची बोली मोहन सलामपुरे यांनी लावली. सर्व १७ व्यापारी शहरातील होते. छोटू शेख आणि सलामपुरे यांची बोली सर्वाधिक असल्यामुळे त्यांना आमराई विक्री करण्यात आली. परिसर विकास समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश शेटकार, प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, उद्यान अधीक्षक डॉ. गोविंद हुंबे, फलोत्पादन तज्ज्ञ किशोर निर्मल या वेळी उपस्थित होते.
विद्यापीठ परिसरातील हूर, लंगडा, हापूस, पायरी आदी प्रजातींच्या १३२५ झाडांना असे आंबे लगडले आहेत.
बातम्या आणखी आहेत...