आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनमंत्री रावते यांच्‍या कारला अपघात, शिवसैनिकांची J.J. बाहेर गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला बुधवारी एका स्विफ्ट गाडीने धडक दिली. या अपघातात रावते यांच्या पायाला दुखापत झाली. जे.जे. इस्पितळात उपचारानंतर त्यांना घरी पाठवले आहे.

अपघातात रावतेंच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ड्रायव्हरलाही मुका मार लागला. पोलिसांनी स्विफ्टच्या चालकाला अटक केली आहे. रस्ता सुरक्षा आणि रॅश ड्रायव्हिंगला प्रतिबंध कसा करता येईल या संदर्भातली बैठक संपवून परत येत असताना लोअर परेलमध्ये हा अपघात झाला. महालक्ष्मीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने अचानक यू टर्न घेतला आणि ती दादरच्या दिशेने जाणाऱ्या रावतेंच्या गाडीवर येऊन धडकली. धडक एवढी जोरदार होती की गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा भाग दबला गेला. अपघातानंतर शिवसैनिक लगेचच मोठ्या संख्येने जमले होते.
कारचे नुकसान
- परिवहनमंत्री रावते यांच्‍या अपघातग्रस्‍त कारचे फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल.
- कारच्‍या बोनेटचे मोठे नुकसान झाले आहे.
- अपघातात रावते किरकोळ जखमी झाले आहेत.
- त्‍यांना तत्‍काळ हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.
- अपघाताची माहिती कळताच जे. जे. हॉस्‍पिटलबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अपघातग्रस्‍त कारचे फोटो..