औरंगाबाद - सुरळीत वाहतूक म्हटले की नियमांचे पालन करणारे नागरिक व त्यासाठी बाध्य करणारी आदर्श व्यवस्था आपल्या डोळ्यासमोर येते, पण औरंगाबाद शहरात मात्र नियम मोडण्यासाठीच असतात, अशा फुशारकीत वागणारे तथाकथित नेते दिमाखात पोलिसांना नेहमी ठेंगा दाखवत मिरवतात. पोलिसही जणू या स्वयंघोषित पुढा-यांचा आणि त्यांच्या चेल्यांचा जणू हक्कच आहे, असे समजून त्यांनाच सलाम ठोकतात. दुसरीकडे टार्गेटसाठी साधे साधे नियम तोडणा-या सामान्य वाहनधारकांकडून लाखोंचा दंड वसूल केला जातो, पण दादा, काका, नानासह सरांच्या नंबर प्लेटवर मात्र कुठलीही कारवाई होत नाही. कारण हे स्वयंघोषित पुढारी पोलिसांना दाद देत नाहीत.
पोलिसांनी 1 जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत हजारो वाहनावंर कारवाई करत कोटीचा दंड वसूल केला. मात्र, ही कारवाई होऊनही शहरात अनेक स्वयंघोषित नेत्यांनी वाहतुकीच्या नियमाला केराची टोपली दाखवली. याबाबत ‘डीबी स्टार’ने यापूर्वीही नाना, मामा, भाऊंबाबतची परिस्थिती चव्हाट्यावर आणली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई केली, मात्र ही प्रक्रिया निरंतर नसल्याने नियम तोडणा-यांचे पुन्हा फावते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नियम तोडणा-या विविध पक्षांच्या स्वयंघोषित नेत्यांवर सातत्याने कारवाई करण्याची गरज असल्याची जनभावना सामान्यांची आहे; परंतु वाहतूक पोलिस विविध मोहिमांच्या नावाखाली वेळखाऊपणा करत असल्याचे समोर येते. लग्नसराईमुळे पोलिसांनी तूर्तास आपला मोर्चा ब्लॅक फिल्म व चेन स्नॅचिंग करणा-यांच्या मागे वळवल्याचे सांगितले.
पुढे वाचा....