आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन दिवसांत १५० वाहने जप्त, परिवहन कार्यालयातर्फे कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाढते अपघात आणि बेशिस्त वाहतुकीला जरब बसवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहरातील जालना रोड आणि सिल्लोडमध्ये धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. तीन दिवसांतील कारवाईत १५० पेक्षा अधिक गाड्या जप्त करण्यात आल्या आणि ७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

जप्त केलेल्या गाड्या मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉपमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. आरटीओने वाहनधारकांना ८,५०० पासून २५ हजारांपर्यंत दंड आकारला. वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, बॅच नसणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रिक्षा, व्हॅन, ट्रक, टेम्पो, अ‍ॅपेरिक्षा, डिलिव्हरी व्हॅन आदी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. शहराबरोबरच सिल्लोडमध्येही ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सेंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक संदीप मुरकुटे, सचिन बंग यांनी ही कारवाई केली. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजित बोऱ्हाडे यांनीदेखील कारवाईसाठी सहकार्य केले.