आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवेरा’चे चालक शिकले वाहतूक नियमांचे बारकावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाहतूक नियमांचे महत्त्व जाणून सवेरा ट्रान्सपोर्टने आपल्या वाहनचालकांसाठी वाहतूक नियमांचा उजळणी कार्यक्रम आयोजित केला होता. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकांनी या वेळी वाहतूक नियमांचे बारकावे जाणून घेतले. औरंगाबाद वाहतूक शाखा आणि डीबी स्टारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत सवेरा ट्रान्सपोर्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बससारखी अवजड वाहने चालवताना चालकांवर जबाबदारीही मोठी असते. अपघातामध्ये वाहनाच्या नुकसानीसह जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालकांचे चौफेर लक्ष असायला हवे. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर अपघात टाळले जाऊ शकतात.
याच जाणिवेतून सवेरा ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी आपल्या चालकांसाठी या सेमिनारचे आयोजन केले होते. या वेळी वाहतूक शाखेच्या टीमने चालकांना वाहतुकीचे नियम सांगितले. कोणत्या नियमांच्या उल्लंघनासाठी किती दंड भरावा, आवश्यक कागदपत्रे कोणती याबाबत माहिती दिली. चालकांनीही त्यांना येणा-या अडचणी व प्रश्न विचारले.