आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजाराचा फटका: बस शोधताना प्रवासी घामाघूम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ट्रॅव्हल्ससाठी ईझी डे मॉलसमोर थांबा निश्चित केला. पण येथे सोमवारी भरणारा आठवडी बाजार प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरला. भाजी विक्रेत्यांनी मॉलजवळील जागेचा ताबा घेतल्याने दिवसभर सर्व ट्रॅव्हल्स रस्त्यावरच थांबल्या. रात्रीच्या वेळेला ट्रॅव्हल्सच्या लांबच लांब रांगेत बस शोधताना प्रवासी घामाघूम झाले. पोलिसांच्या या निर्णयावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पोलिस फिरकलेच नाहीत
बाजारामुळे ट्रॅव्हल्स बराच वेळ रस्त्यावरच उभ्या होत्या. सूतगिरणी चौकाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक खोळंबली. सिग्मा हॉस्पिटलच्या बाजूने असलेला रस्ता ओलांडताना महिला, ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडाली. प्रवाशांना आणून सोडणाऱ्या कॅब, रिक्षा तसेच वैयक्तिक गाड्याही रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. परंतु एकही पोलिस कर्मचारी फिरकला नाही.
राजेंद्र जंजाळ यांची मध्यस्थी
सर्वट्रॅव्हल्स चालकांनी रोजच्याप्रमाणे मॉलच्या आवारात बसेस उभ्या केल्या. भाजी विक्रेत्यांचे येणे जसे सुरू झाले तसे तेथे गदारोळ होण्यास सुरुवात झाली. मनपाचे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी दुपारी एकच्या सुमारास या ठिकाणी भेट देऊन ट्रॅव्हल्स बाहेर लावण्यास सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे जंजाळ यांनी सांगितले.
बाजारामुळे सर्व जागा व्यापली
गेल्या अनेक वर्षांपासून येथे बाजार भरतो. याची माहिती असूनही प्रवासी आणि नागरिकांची अडचण टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने काही व्यवस्था केली नसल्याचे चित्र होते. दिवसभर जवळपास ५० ते ६० ट्रॅव्हल्स ये-जा करतात. बाजारामुळे सर्व जागा भाजीविक्रेत्यांकडून कायम व्यापली जाते. त्यामुळे सोमवारी ट्रॅव्हल्स कुठे उभ्या करायच्या, हा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रवाशांना बस सापडेना, फोनही व्यग्र....
बातम्या आणखी आहेत...