आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चालकाचा बेदरकारपणा : प्रवाशांनी ट्रॅव्हल्स बस थेट पोलिस ठाण्यात नेली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.

औरंगाबाद- नागपूर-नाशिकदरम्यानधावणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाने रविवारी रात्री निष्काळजीपणे बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. प्रवासादरम्यान अनेकांना किरकोळ मार लागला. संतापलेल्या प्रवाशांनी औरंगाबादेत आल्यानंतर ही ट्रॅव्हल्स थेट पोलिस ठाण्यात नेण्यास भाग पाडले. मात्र तक्रारीअभावी चालकावर कारवाई झाली नाही. अखेर त्याच बसने प्रवाशांना पुढचा प्रवास करावा लागला. 

 

नागपूर येथील राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स एजन्सीची बस रविवारी नाशिककडे निघाली. बुलडाण्याजवळ आल्यानंतर चालकाने बस सुसाट निष्काळजीपणाने चालवल्याने काही प्रवाशांना किरकोळ मार लागला. या गाडीतील काही प्रवासी औरंगाबादचे होते. त्यांनी बस थेट चिकलठाणा पोलिस ठाण्यासमोर उभी केली. मात्र सदरची घटना सिडको हद्दीत येते, तुम्ही तिकडे जा, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर प्रवासी एमआयडीसी सिडको ठाण्यात गेले. तेथे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून औषधोपचारासाठी घाटीत पाठवतो. तुम्ही चालकाविरुद्ध तक्रार द्या, असे सांगितले. मात्र काही प्रवाशांना नाशिकला जाण्याची घाई असल्याने तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नाही. अखेर पोलिसांनी चालकाला समज दिल्यानंतर बसचा पुढचा प्रवास सुरू झाला. 

बातम्या आणखी आहेत...