आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यान अधीक्षकांचा प्रस्ताव, अभियंत्यांना पत्ताच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नियमा प्रमाणे मनपा निवडणूक होताच सहा महिन्यांच्या आत वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली जाते. पण उद्यान विभाग प्रस्ताव पाठवला म्हणतो, तर कार्यकारी अभियंता तसा प्रस्तावच आला नसल्याचे म्हणत जबाबदारी झटकत आहेत. त्यांच्याच विभागातील कारकून मात्र प्रस्ताव आला असून साहेबांना कल्पनाही दिल्याचे सांगतो. या टोलवाटोलवीत समितीची स्थापना झाली नाही. त्यामुळे शहरभरात सर्रास वृक्ष तोड होत आहे. शिवाय समितीच नसल्याने अनेक कामे अडत आहेत; पण त्याचे कुणालाही सोयरसुतक नाही.मनपात वृक्ष प्राधिकरण समितीच अस्तित्वात नसल्याने शहरात सर्रास वृक्षतोड होत आहे. तरीही मनपाला याचे अजिबात गांभीर्य नाही. याबाबत डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे मनपा जागी झाली. उद्यान विभागाने तातडीने वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू केल्या. कार्यकारी अभियंत्यांना लगेच प्रस्तावही पाठवण्यात आला. मात्र, दोन महिन्यांपासून त्यावर कुठलीच हालचाल झाली नाही. हा प्रस्ताव टेबलावर धूळ खात पडून असल्याचे या अधिकाऱ्याला माहितीच नसल्याचे चमूने केलेल्या तपासातून उघड झाले आहे. एका अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या महत्त्वाच्या समितीला ग्रहण लागले आहे.महाराष्ट्र वृक्षसंवर्धन जतन अधिनियम १९७५ नुसार मनपाची निवडणूक झाली की तत्काळ वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीतील सदस्य संख्या १५ पर्यंत असू शकते. मनपा आयुक्त हे समितीचे अध्यक्ष असतात.
समिती स्थापन करण्याबाबत उद्यान अधीक्षक, कार्यकारी अभियंत्याकडे प्रस्ताव पाठवतात, कार्यकारी अभियंता पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताप शहर अभियंत्याकडे पाठवतात. यानंतर प्रशासकीय मंजुरीसाठी हा प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे सादर करतात, यावर सर्वसाधारण सभेत ठराव घेतला जातो. यानंतर महापौर सदस्य नियुक्तीचा ठराव मंजूर करतात; पण प्रत्यक्षात यंदा निवडणुकीला सहा महिने उलटूनही समिती स्थापन झालेली नाही.प्रस्ताव मात्र टेबलावर पडूनउद्यानअधीक्षकांनी पाठवलेला प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्या टेबलावर पडून आहे. दोन महिन्यांपूर्वीच उद्यान अधीक्षकांकडून प्रस्ताव आलेला आहे. त्याला आवक- जावक रजिस्टरमध्ये खतवून मी साहेबांच्या टेबलावर ठेवून त्याची कल्पनाही दिली ‌‌असल्याचे विभागातील कारकूनाने सांगितले.
अभियंत्यांना माहितीच नाही
याबाबतसिकंदर अली यांना अनेक वेळा संपर्क केला; पण त्यांनी उत्तर दिले नाही. महापौरांच्या स्वीय सहायकामार्फत अलींकडून माहिती घेतली तेव्हा त्यांनी याबाबत उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना विचारावे लागेल. माझ्याकडे प्रस्ताव आला की नाही सांगता येणार नाही, असे उत्तर दिले.
एकीकडे झाडांची सर्रास कत्तल होते, तर दुसरीकडे अशी धोकादायक झाडे आहेत. वृक्ष प्राधिकरण समितीच नसल्याने कुठलाही निर्णय होत नाही आणि झाडे तोडणाऱ्यांवर कारवाईही होत नाही.

प्रस्ताव पाठवलाय
^मीदोन महिन्यांपूर्वीच समिती स्थापन करण्याबाबत प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याच्या आवक- जावक क्रमांकाची नाेंद माझ्याकडे आहे. कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंत्यांचा अंतिम निर्णय आल्यावर समिती स्थापन होईल. मी प्रभारी असताना माझ्याकडे वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्याबाबबत कुठलाही प्रस्ताव आलेला नव्हता. यामुळे मी अधिक काही सांगू शकत नाही. एम.एन. काझी, प्रभारी कार्यकारी अभियंता

संबंधितांना सूचना करतो
^वृक्षप्राधिकरण समिती स्थापन करण्याबाबतचा कुठलाही प्रस्तावच अद्याप माझ्याकडे आलेला नाही. याबाबत मी लवकरात लवकर संबंधित विभागाला सूचना करतो. त्यानंतर तातडीने समिती स्थापन करण्याबाबत पाऊले उचलली जातील. सखाराम पानझडे, शहर अभियंता

तर प्रस्ताव तयार करू
^प्राधिकरणसमिती स्थापन करण्याबाबत प्रस्ताव आला नसेल तर तो तयार करून घेऊ आणि ताबडतोब समिती स्थापन करून याबाबत काय तो निर्णय घेऊ. त्रिंबकतुपे, महापौर