आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाणा एमआयडीसीत अनेक वृक्षांची कत्तल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबीस्टार - चिकलठाणा एमआयडीसीतील एका मोकळ्या भूखंडावरील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. चिंच, लिंब, सुबाभूळ, लॅटोफाेरम, निलगिरी आणि गुलमोहरासह इतर अनेक मोठे वृक्ष निर्दयीपणे कटर आणि जेसीबीच्या मदतीने मुळासकट तोडण्यात आले. सुटीचे दिवस पाहून दोन दिवसांत हा डाव साधण्यात आला. विशेष म्हणजे जेथे ही झाडे तोडली गेली तेथून प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे.
एकीकडे राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचा उद्देश ठेवून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे आहे ती झाडे तोडून परिसरच्या परिसर बोडखे केले जात आहेत. तसाच हा प्रकार. चिकलठाणा एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-२१ वर वसलेल्या डेस्कन कॉस्टिंग लिमिटेड कंपनीला लागूनच अंदाजे एकर परिसराचा मोकळा भूखंड आहे. यावर गुलमोहर, चिंच, प्लॅटोफॉर्म, निलगिरी, सुळबाभूळ, लिंब यासह विविध प्रजातीची २० ते ३० वर्षे जुनी शेकडो झाडे आहेत. त्यातील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली.

या भूखंडावर देवगिरी बँकेचा कायदेशीर ताबा आहे. डेस्कन कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या बाजूने असलेल्या या भूखंडावरील अनेक झाडांवर लाकूडतोड्यांनी कटर लावले; पण काही जागरूक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने अनेक झाडे वाचली. पण तरीही सलग दोन दिवसांच्या सुटीच्या काळात अनेक झाडे तोडून लाकूडफाडा पसार करण्यात आला. सुटी पाहून हा डाव साधला गेला. अनेक जुनी झाडे जेसीबी कटरच्या मदतीने मूळ खोडासह तोडली गेली. त्यात चिंच, लिंब, सुबाभूळ, निलगिरीसह इतर काही झाडांचा समावेश आहे. हे करताना कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे डीबी स्टारच्या तपासातून स्पष्ट झाले. येथे दिसणारा हा लाकूडफाटा निम्माही नाही. कारण ही बाब कळेपर्यंत त्यातला मोठा हिस्सा पळवण्यात आला.

विनापरवाना वृक्षतोडझाली असेल तर नुकत्याच दिलेल्या न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे संबंधित लाकूतोड्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले त्यांचीही सखोल चौकशी करणार असून आम्ही यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारू. राजूशिंदे, नगरसेवक

काही महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीतून पावणेदोन लाखाचा एेवज लंपास झाला होता. याबाबत आमच्या प्रशासनाने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे. कंपनीला लागून असलेल्या सुरक्षा भिंतीवर याच झाडांवरून चोर येत असल्याची शंका आम्ही भूखंडावरील सुरक्षा कर्मचाऱ्याला सांगितली होती. कदाचित त्यांनी ती तोडली असावीत. आमचा आणि या वृक्षतोडीचा काहीही संबंध नाही. वसंतसांगळे, प्रोडक्शनसुपरवायझर, संदीप वासनिक, सहायक मानव संसाधन अधिकारी, डेस्कन

भूखंडाच्या शेजारीअसलेल्या डेस्कन कंपनीच्या प्रशासनानेच ही झाडे तोडली आहेत. वेळ पडल्यास ज्या क्रेन आणि जेसीबीवाल्या लोकांना या कंपनीच्या प्रशासनाने पैसे दिले त्यांना मी आणून उभा करू शकतो. त्यामुळे आमचा आणि भूखंडावर झालेल्या वृक्षतोडीचा काही संबंध नाही. बाबाखान, निरीक्षक,सुराणा इन्फ्रास्ट्रक्चर

काय म्हणतात तक्रारदार ?
चिकलठाणा एमआयडीसीत बॉयलरसाठी लाकडाचा वापर करतात.कोळशापेक्षा अवैधरीत्या कत्तल करून आणलेले लाकूड स्वस्तात उपलब्ध होत असल्याने उत्पादक लाकडाला पसंती देतात. पैसा मिळतो म्हणून लाकूडतोडे वृक्षांची कत्तल करून एमआयडीसीतच विकतात. मात्र, हा उद्योग करताना कंपनीचालकांनी लाकूडतोड्याकडे संबंधित विभागाचा वृक्षतोडीचा परवाना होता काय हे तपासले पाहिजे. सुनील भुईगड

चिकलठाणाएमआयडीसीतमनपा आणि एमआयडीसी प्राधिकरणाने वृक्षतोड बचाव समिती स्थापन करावी. यात दोन्ही विभागाने हेल्पालाइन व्यवस्था करावी. जागरूक नागरिकांनी संपर्क केल्यास यंत्रणा तातडीने यायला हवी. तरच वृक्षतोडीवर लगाम लागेल. संतोषएडके
सकाळीआम्हीग्राउंडवर फुटबॉल खेळून घरी परतत असताना आम्हाला वृक्षतोडीचा आवाज आला. आम्ही काही मित्रांना संपर्क करून बोलावले. लाकूडतोड्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी पळ काढला. अमोल गायकवाड, फुटबॉलपटू

बातम्या आणखी आहेत...