आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडी गावात २० वर्षे जुन्या कडुनिंबाच्या झाडाची कत्तल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - खासगी किंवा सरकारी जागेवर असणारे वृक्ष विनापरवानगी कोणालाही तोडता येत नाहीत, वृक्षांची सूचीनिहाय जबाबदारी वेगवेगळ्या प्रशासनाकडे देण्यात आलेली आहे. त्यानुसार वृक्षतोड करण्यासाठी तसेच कायदेशीर परवानगी घेऊन तोडलेल्या वृक्षांची विल्हेवाट-वाहतूक करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, जेव्हा लोकप्रतिनिधींकडूनच कायद्याची पायमल्ली होते तेव्हा प्रशासन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करते की कायद्यातील पळवाटा शोधून त्याला पाठिंबा देते याच्यावर वर्तमानातील वृक्षांचे भविष्य अवलंबून आहे.
असाच प्रकार मुंबई महामार्गावर असणाऱ्या करोडी या गावात घडला. एका ग्रामपंचायत सदस्याने पुढाकार घेऊन दोघा लाकूडतोड्यांकडून वृक्षतोड केली आहे. मात्र संबंधित लाकूडतोड्यांसह ‘त्या’ सदस्यावर आता गुन्हा दाखल होणार का? याची प्रतीक्षा अनेक वृक्षप्रेमींना आहे.
औरंगाबाद-मुंबई महामार्गावर असणाऱ्या साजापूर-करोडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या गावठाण जमिनीवरील २० वर्षे जुन्या कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या बेकायदेशीररीत्या तोडल्याचा प्रकार सोमवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी घडला. एका सदस्यासह दोन लाकूडतोड्यांनी हा बेकायदेशीर पराक्रम केला. इलेक्ट्रिकल कटरच्या साहाय्याने झाडाची कत्तल करणारे ग्रामपंचायत सदस्य देविदास गवांदेसह अन्य दोन लाकूडतोड्यांवर चौकशीअंती कायदेशीर योग्य कारवाई करणार असल्याचे उपसरपंच सय्यद कलीम यांनी सांगितले.

एकीकडे भारत सरकार वृक्ष लागवड संवर्धनासाठी अतोनात प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी आपल्या पदांचा गैरवापर करत बिनदिक्कतपणे वृक्षांची खुलेआम विनापरवानगी कत्तल करत असल्याचा अनुभव करोडी गावकऱ्यांना सोमवारी आला. गावातील जिल्हा परिषद मैदानालगत गावठाण जमिनीवर साधारण २० वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या कडुनिंबाच्या झाडावर कटर घेऊन आलेल्या दोघांनी कटर चालवत काही क्षणातच वृक्षाचे हाल केले. हा सर्व प्रकार ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सुरू असूनही संबंधित लाकूडतोड्यांना कोणीच अडवले किंवा विरोध केला नाही. मात्र, गावातील काही सुज्ञ नागरिक विरोध करण्यासाठी पुढे येत असल्याचे लक्षात येताच लाकूडतोडे दोघांनी फांद्यांची छाटणी पूर्ण होताच फांद्या वृक्षाभोवतीच टाकून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. वृक्षाचा बराच मोठा भाग कापण्यात आल्यामुळे नेहमी हिरवेगार दिसणारे वृक्ष आज मात्र बोडखे दिसू लागले.
^शासकीय किंवाखासगी जागेमध्ये असणारे कुठलेही वृक्ष विनापरवानगी तोडण्याचा अधिकार कोणालाच नाही. कडुनिंबाच्या वृक्षांच्या फांद्या तोडूनसुद्धा कायद्याचे उल्लंघन झालेेले आहे. महसूल विभागाकडून कारवाई अपेक्षित आहे. आम्ही वाहतुकीसाठी परवानगी देतो तेसुद्धा कायदेशीर तोडण्यात आलेल्या वृक्षांनाच. अनिलपाटील, वन परिमंडल अधिकारी, दौलताबाद विभाग

^पर्यावरण संवर्धनासाठी लोक प्रतिनिधींकडून पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा प्रकारे विनापरवानगी वृक्षतोड होणे योग्य नाही. ज्ञानेश्वरगोल्हार, ग्रा.पं सदस्य, करोडी
^लगतच्याजुन्याशाळेवरील पत्रे खराब झाले आहेत. त्या पत्र्यांवर फांद्या येत असल्यामुळे दोन-तीन फांद्या कापल्या आहेत. याबाबतची माहिती तलाठी सरपंच यांना दिलेली आहे. देविदासगवांदे, करोडी ग्रा.पं सदस्य

^हा प्रकार गावठाण हद्दीमध्ये झाला आहे. त्यामुळे कायदेशीर माझा काही एक संबंध नाही. ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तो अधिकार त्यांचा आहे. बागडे,तलाठी
^अंगणवाडीसाठीपरवानगीमिळाली,त्यामुळे फांद्या तोडल्या असणार. मी उद्या आल्यानंतर पूर्ण माहिती घेतो. हरीशआंधळे, ग्रामविकास अधिकारी, करोडी-साजापूर

वन विभागाची परवानगी घेतलेली नाही. मंगळवारी तहसीलदारांशी चर्चा केल्यानंतर संबंधित सदस्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही हे ठरवणार. कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...