आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात एकाच दिवशी 7 लाख ३१ हजार १०३ रोपांची लागवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत शुक्रवारी आैरंगाबाद जिल्ह्याने निश्चित उद्दिष्ट पूर्ण करत १०२ टक्के रोपे लावली. जिल्ह्यात दिवसभरात लाख ३१ हजार १०३ रोपे लावण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या लाखांच्या उद्दिष्टापेक्षा ही संख्या १३ हजार १०३ रोपांनी अधिक आहे. राज्याच्या वनखात्याच्या वतीने राज्यभरात जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. याअंतर्गत १.५ कोटी वृक्ष वनखाते, तर ५० लाख वृक्ष शासनाचे अन्य विभाग आणि स्वयंसेवी संस्था लावणार होत्या. प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या भौगोलिक आकारानुसार उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यासाठी लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टपूर्तीसाठी वनखाते महिनाभरापासून कामाला लागले होते. आज त्याचा परिणाम दिसून आला. सकाळपासूनच वृक्षारोपणासाठी विविध विभागांमध्ये धावपळ सुरू होती. वाहनांमध्ये झाडांची रोपटी नेतानाचे दृश्य दिसून आले.
वन खात्याला संध्याकाळी वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्याने वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ओलांडले आहे. वनखात्याने लाख ३० हजार वृक्षांची लागवड केली, तर सार्वजनिक वनीकरण विभागाने १५ हजार झाडे लावली. अन्य शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आदींनी मिळून लाख ८६ हजार झाडे लावली. अशा पद्धतीने जिल्ह्यात एका दिवसात लाख ३१ हजार १०३ झाडे लावण्यात आली. दरम्यान, वनखात्याकडे खासगी नर्सरीतून नेलेल्या झाडांची आकडेवारी नाही. ही आकडेवारी मिळाली तर वृक्ष लागवडीची संख्या ७.८ ते लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

लोक चळवळ झाली
सकाळपासूनच शहरासह विभागात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी, विविध संस्थांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदवला. ही मोहीम केवळ शासनाची राहता ती जनसामान्यांची झाली. जनसहभागामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष जगतील अशी खात्री वाटते. आज कृषी दिन असल्याने या मोहिमेत आणखीच उत्साह दिसून आला. जलयुक्त शिवारप्रमाणे वनयुक्त शिवार ही आता लोकचळवळ झाली आहे. -डॉ. उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त

सर्वांच्या सहभागाचे यश
जनतेच्या सहभागामुळे जिल्ह्यासाठी निश्चित केलेले टार्गेट आम्ही सहज पार केले. अजून खासगी नर्सरीकडून नेलेल्या झाडांची आकडेवारी आलेली नाही. ती समजल्यानंतर निश्चित उद्दिष्टापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात वृक्षारोपण झाल्याचे स्पष्ट होईल. शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, शाळा, कॉलेज यासह सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाचे हे यश आहे. -अ.पा. गिऱ्हेपुजे, उपवनसंरक्षक, औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...