आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधेलीच्या एमजीएम परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाचा जागर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘एकवृक्ष एक जीवन’ हा संकल्प घेऊन दैनिक दिव्य मराठीने एमजीएमच्या सहकार्याने शहरवासीयांना महावृक्षारोपणाचे आवाहन केले होते, याला प्रतिसाद देत शेकडो औरंगाबादकरांनी गांधेलीच्या एमजीएम परिसरात वृक्षारोपण केले. वड, पिंपळ, चिंच, मोहोगनीसह फळांची सव्वातीन हजार झाडे १०६ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात लावण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांच्या हस्ते वृक्षारोपणाने अभियानाला सुरुवात झाली. निसर्गरम्य परिसरात अल्पोपाहार, फोटोग्राफी, पथनाट्य, जनजागृतिपर कीर्तन आदी कार्यक्रमांनी रविवारचा (७ ऑगस्ट) दिवस अविस्मरणीय ठरला.
शेकडो औरंगाबादकरांच्या साक्षीने गांधेली परिसरात झालेल्या या महावृक्षारोपण सोहळ्यात शहरातील मान्यवरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पाहुण्यांचे स्वागत “दिव्य मराठी’चे सीओओ निशित जैन, राज्य संपादक प्रशांत दीक्षित, निवासी संपादक दीपक पटवे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनी केले. या वेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, महापौर त्र्यंबक तुपे, सीआयआयचे अध्यक्ष संदीप नागोरी, मसिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, राज्य राखीव पोलिस दलाचे कमांडंट निसार तांबोळी, पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, माजी आ. डॉ. कल्याण काळे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र राठोड, गटनेते राजू वैद्य, नगरसेवक नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, तहसीलदार रमेश मुनलोड, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, सुभेदार बन, डॉ. मानवेंद्र काचोळे, एमजीएम एमबीए महाविद्यालयाचे संचालक कर्नल प्रवीणकुमार, संस्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक रतू ठाकूर, अॅग्री बायोटेक महाविद्यालयाचे प्राचार्य बी. ए. चव्हाण, फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. रोडगे, नानासाहेब कदम, अॅग्री महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. शिंदे, डॉ. गिरीश गाडेकर, डॉ. अस्मिता सूर्यवंशी, जर्नालिझम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, फाइन आर्ट््स महाविद्यालयाच्या विजया पातूरकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात पैठण तालुक्यातील एकतुनी येथील संत काकासाहेब महाराज भजनी मंडळ, संभाजी महाराज भानुसे, गणेश महाराज डहाळे, प्रल्हाद महाराज डकले, मारुती महाराज बोडखे, दत्ता महाराज घोडके यांचाही सहभाग होता.

अमूल्य सामाजिक योगदान
मागील दिवसांपासून तयारी सुरू असलेले हे अभियान वृक्षारोपणात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात वृक्ष चळवळीची गरज होती. दै. दिव्य मराठीच्या प्रेरणेने आणि एमजीएमच्या सहकार्याने हा उपक्रम जनमानसात फोफावला. हे अमूल्य सामाजिक योगदान आहे, असे बागडे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...