आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगसाठी झाडे जाळण्याचा सपाटा, आग लावून नियोजनबद्ध पद्धतीने केली जातेय पर्यावरणाची हानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाहनांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून सिडकोतील हरितपट्टा त्यातील झाडे जाळून टाकून बोडखा करण्याचा सपाटा काही महाभागांनी लावला आहे. कुऱ्हाडीचे घाव घालून कत्तल करण्याबरोबरच आता अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ही झाडे जाळली जात आहेत. हिरवीगार वाढलेली झाडे आधी दिवसा कुऱ्हाडीने निम्मी कापल्यासारखी केली जातात आणि नंतर रात्री जाळ लावून त्यांची राख केली जाते. यामुळे हा पट्टा उजाड होत आहे.
 
एकीकडे काही लोक स्वखर्चातून हे हरितपट्टे खुलवतात. निरनिराळी झाडे लावून ती सुशोभित करून त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावतात. तर दुसरीकडे काही लोक पद्धतशीरपणे आहे ते हरितपट्टे बोडखे करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. नवीन झाडे लावणे दूरच, आहे त्या झाडांची कत्तल केली जात आहे. सिडकोतील या लांबलचक हरितपट्यातील काही वाहनविक्रेते, वॉशिंग सेंटर, टपरीचालक, बांधकाम व्यावसायिक आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांनी हा प्रकार चालवल्याचे बोलले जात आहे. अर्थात यावर लक्ष ठेवून कारवाई होत नाही. त्यामुळे सातत्याने झाडे कापून ती जाळून टाकली जात आहेत. याकडे लक्ष दिले नाही तर सारा पट्टाच बोडखा व्हायला वेळ लागणार नाही.
 
अजूनही वेळ गेली नाही 
आजहीया हरितपट्टयात बऱ्यापैकी हिरवळ दिसते. सुबाभूळ, गुलमोहर, लिंब, चिंच, बदाम, काशीद, पिवळा गुलमोहर, वड, पिंपळ अशी विविध प्रजातींतील झाडे येथे आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी ही झाडे आल्हाददायक अनुभव देतात. त्यातील अनेक झाडे तोडली गेली असली तरी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे त्याकडे यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच हा पट्टा पुन्हा बहरेल. 
 
वृक्षारोपण अन् दत्तक योजना... 
हाहरितपट्टा पुन्हा पूर्वीसारखा व्हावा यासाठी मनपाने या ठिकाणी नव्याने ठरवून वृक्षारोपण करावे. शिवाय अनेक उद्योजक हे पट्टे दत्तक घ्यायला तयार आहेत. त्यांना योग्य अटी शर्तीनुसार ते तसे द्यावेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या जाहिराती करण्याची मुभा द्यावी. त्यातून साऱ्यांचेच भले होईल. 

लठवतात अशा क्लृप्त्या 
- नंतर एकदा सवय झाली की तेथे शेकडो वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली जातेे. 
- या जागेवर त्यानंतर जुन्या बांधकाम साहित्याचा तर कुठे माती आणि मुुरुमाचा भराव टाकून जागेचे सपाटीकरण केले जाते. 
- त्यानंतर एकदम सारे झाड तोडून एक तर ते जाळले जाते किंवा खोड तसेच ठेवून फेकून दिले जाते. 
- नंतर काही फांद्या तोडल्या जातात. 
- एकदा हे खोड वाळले की त्यावर घाव घालून त्याला निम्म्या खाचा केल्या जातात. 
- आधी झाडाच्या खोडाला आग लावून त्यांना वाळवले जाते. 
- हरितपट्ट्यातील ही झाडे कापण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. 

काय म्हणतात जबाबदार 
- अशावाहन धारकांची वाहने जप्त करण्याचे काम अतिक्रमण विभागाचे आहे. जर कुणी झाडांचे नुकसान करत असेल आणि आमच्या नजरेस अशी व्यक्ती आढळली तर आम्ही कारवाई करणारच. विजयपाटील, उद्यानअधीक्षक, मनपा 
- हरितपट्ट्यातील वाहने जप्त करून त्यावर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. याबाबत आम्ही पोलिस प्रशासनाला पत्र देऊ आणि तातडीने तेथे कारवाई करू. - रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा.
- मनपानेवृक्षारोपणकेल्यास कुणीही वाहने लावणार नाहीत. हरितपट्ट्यातील अनेक झाडे धोकादायक आहेत. ती तुटायला आलीत. याउलट मनपाने ती तोडून नव्याने झाडे लावावीत. - अनेक व्यावसायिक
बातम्या आणखी आहेत...