आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण रोडवरील झाडे तोडू नका, पर्यायी रस्ता करा; वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींचा एल्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडू नका, गरज पडल्यास पर्यायी रस्ता करा पण हे ‘ग्रीन कव्हर’ जपा. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. अजिंठा-वेरूळप्रमाणे या वृक्षांचीही काळजी घ्या. शे-दीडशे वर्षे जुनी वृक्षसंपत्ती वारसा म्हणून तरी जपा. पर्यावरणाचा समतोल बिघडवू नका, अशा शब्दांत शनिवारी पैठण रोडवर शहरातील पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. 'चिपको आंदोलना'प्रमाणे आमचे हे अभियान सुरूच राहील, असेही या पर्यावरणप्रेमींनी स्पष्ट केले.

पैठण रोडच्या रुंदीकरणासाठी ही झाडे तोडावी लागणार होती. त्याबाबत वृक्षप्रेमींसह मनपाचा उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची विभागीय आयुक्तांकडे खास बैठक झाली होती. त्यात चांगला पाऊस पडल्यानंतर पैठण रस्त्यावरील झाडांचे पुनर्रोपण करण्याची मोहीम हाती घ्या. यास संबंधित विभागांनी संमती दर्शवली. मात्र, मध्येच सार्वजनिक बांधकाम खात्याने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे आदेश धाब्यावर बसवत वृक्षतोड सुरू केली. गेल्या दोन दिवसांत अनेक झाडे तोडली गेली. त्यावर वृक्षप्रेमी नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.

लिंक रोडवर साखळी मोहीम
शनिवारी सकाळी विविध वृक्षप्रेमींनी पैठण रोडवरील लिंक रोडवर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आंदोलन केले. साखळी करत निदर्शने केली. झाडे कापू नका, पर्यायी रस्ता करा, पर्यावरणाचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे, अशा घोषणा असलेले फलक झळकवत या वृक्षप्रेमींनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यात प्रीती शहा, जैन इंजिनिअरींग सोसायटीचे अध्यक्ष  आनंद मिश्रीकोटकर, जायंट्स ग्रुप ऑफ वाळूजचे राजेश मानधने, सारंग पुजारी, महेश देशमुख, निसर्गमित्र मंडळाचे सचिव  किशोर गठडी,  शितल पुजारी, सागर साकला, नागेश देशपांडे, श्रीनिवास देशमुख, अतुल यावलेकर, पी.आर. पानसे या मान्यवरांची उपस्थिती होती.

वारसा म्हणून हा ठेवा जपा
पैठण लिंक रोडवर सर्रासपणे वृक्षांची कत्तल होत आहे. ही झाडे खूप जुनी असून त्यामुळे या मार्गावर ग्रीन कव्हर तयार आहे. ते नष्ट करणे चूक आहे. उलट वारसा म्हणून तरी त्यांचे जतन झाले पाहिजे.  
- प्रीती शहा, पर्यावरणप्रेमी
बातम्या आणखी आहेत...