आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribal, Brahmin Community,Latest News In Divya Marathi

आता आरक्षणासाठी आदिवासी, ब्राह्मण समाज उतरला रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात (एस.टी.) आरक्षण देऊ नये, यासाठी मराठवाडा आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने बुधवारी (30 जुलै) विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. इतर राज्यांत धनगर समाजात एस.टी. प्रवर्गात येत असला, तरी तेथील धनगर आणि येथील धनगर वेगळे असल्याचे सांगत आरक्षण दिल्यास येत्या 9 ऑगस्टला आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा युवकांनी दिला. या मोर्चात विद्यार्थिनींची संख्या उल्लेखनीय होती. धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यायचे असल्यास त्यासाठी वेगळी सूची तयार करण्यात यावी, मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचा समावेश एस.टी. प्रवर्गात होता कामा नये, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
आंदोलकांनी मी आदिवासी आहे, अशा मजकुराच्या टोप्या परिधान केल्या होत्या. राज्यात अन्यत्र आक्रमक आंदोलनाची पार्श्वभूमी असल्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात अध्यक्ष प्रशांत बोडखे, सोपान कोकाटे, तुळशीराम खोटरे, गजानन चौकाते, करतारसिंग साबळे, गणेश जुबडे सहभागी झाले होत.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ-
ब्राह्मण समाजालादेखील अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महासंघाच्या वतीने सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अडवण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे, पुरोहितांना मासिक किमान पाच हजार रुपये मानधन द्यावे, त्यांचा शासकीय किंवा खासगी नोकरीत समावेश करावा, पौरोहित्य हेच ब्राह्मण समाजाच्या उपजीविकेचे साधन आहे, त्यांना आरक्षणामुळे नोकरीही मिळत नाही.
पौरोहित्यातून वर्षातून फक्त शंभर दिवसच रोजगार मिळतो. त्यामुळे बहुतांश समाज दारिद्र्यरेषेखाली जगत आहे. निवेदनात आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिष्टमंडळात संतोष सवई, मयूर रत्नपारखी, जीवन गुरू, अनिल मुळे, सुहासिनी पोळ यांचा समावेश होता.