आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीखाली चिरडून अंत झालेल्या चिमुकलीला औरंगाबादेत कँडल मार्चने श्रद्धांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गाडीखाली चिरडून अंत झालेल्या चिमुकली नाव्याला परिसरातील नागरिकांच्या वतीने बुधवारी सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात कँडल मार्च काढून धीरगंभीर वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजेदरम्यान टीव्ही सेंटर चौकात नाव्या आणि सायली या बहिणींना (एमएच 21 व्ही 501) या गाडीने चिरडले. यामध्ये नाव्याचा जागीच अंत झाला, तर सायली गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील संतप्त जमावाने गाडीची तोडफोड केली.

गाडीचा चालक सय्यद बिलाल सय्यद कदीर मौलाना आणि मोहंमद अमर चाऊस दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला आहे. मंगळवारी पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीची कागदपत्रांच्या आधारे बुधवारी जालना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संपूर्ण माहिती मागवली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर गाडीमालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नेते संपर्कात
अपघातानंतर पोलिसांनी बिलालला ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सिडको, हडकोसह राष्ट्रवादीचे अनेक नेते सिडको पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद पाटील, विश्वनाथ स्वामी, राजू खरे आदी मंडळी मंगळवारपासून सिडको पोलिसांच्या संपर्कात होते.