आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Triph International Not Give ESI Claim To Young Lady

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रिम्फ इंटरनॅशनल कंपनी ईएसआय क्लेमसाठी करतेय तरुणीचा छळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादेत प्रोझोन मॉलमधील शॉपर्स स्टॉपमध्ये पहिल्या मजल्यावर ट्रिम्फ इंटरनॅशनल हे लेडीज गारमेंटचे दालन आहे. त्यात ज्योती भिकाजी वाघमारे (22) ही तरुणी 3 वर्षांपासून सेल्स अँडव्हायझर म्हणून नोकरी करते. 5 ऑक्टोबर 2010 पासून ती दालनात कामाला आहे. ऑगस्ट 2011 मध्ये ज्योती अचानक आजारी पडली. खूप अशक्तपणा आल्याने तिला वडिलांनी सिडको एन-4 मधील केतकी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढच्या उपचारासाठी तिला दंडे रुग्णालयात आणण्यात आले. पण आजाराचे निदान होईना. शेवटी ज्योती कोमात गेल्याने तिला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. आनंद निकाळजेंच्या उपचाराने ती बरी झाली. या दोन महिन्यांच्या उपचारासाठी तब्बल 4 लाख रुपये खर्च झाल्याचे ज्योतीचे वडील भिकाराम वाघमारे यांचे म्हणणे आहे.

ईएसआय सुविधेबाबत चालढकल
या आजारपणामुळे ज्योतीने कंपनीला ईएसआयची सुविधा मागितली तेव्हा कंपनीने खूप उशिरा तिला ईएसआयचे टेम्पररी कार्ड दिले. हे कार्ड पुण्याच्या कार्यालयाचे असल्याचे औरंगाबादेतील ईएसआयसी कार्यालयाकडून सांगण्यात आले. ज्योतीने औरंगाबादेत उपचार घेतलेली बिले कंपनीला पाठवून दिली. मात्र, कंपनीने तिची ही बिलाची फाइल परत पाठवली. दोन वर्षांपासून आजारी ज्योती व तिचे कर्जबाजारी वडील ईएसआयच्या क्लेमबाबत मार्गदर्शन मागत होते, पण आम्हाला ई-मेलवर काही कागदपत्रे पाठवून आमची बोळवण करण्यात आल्याचे ज्योतीच्या पालकांनी सांगितले.

डीबी स्टार तपास
पुणे ईएसआयसी कार्यालयात औरंगाबादच्या कर्मचार्‍यांची ईएसआयची रक्कम भरली जाते. त्यामुळे येथील कर्मचार्‍यांना त्याचा फायदा घेता येत नाही. याबाबत कंपनीचे अधिकारीही स्पष्ट मार्गदर्शन करत नसल्याचे डीबी स्टारच्या तपासात निष्पन्न झाले. कंपनीच्या मुंबई येथील कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला, पण त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. 5 ऑक्टोबर 2010 रोजी ज्योतीला पहिली पे स्लिप मिळाली आहे. त्यात ईएसआय व पीएफचे पैसे कापण्यात आले आहेत, मात्र पे स्लिपवर ईएसआय व पीएफचा कुठलाही क्रमांक देण्यात आलेला नाही हे विशेष.

सुरू झाले धमक्यांचे फोन
सर्व स्तरावर प्रयत्न केल्यावरही हक्काचा लाभ न मिळाल्याने अखेर ज्योतीने डीबी स्टारकडे कैफियत मांडली. याची माहिती कंपनीला कळाली. त्यामुळे त्यांनी ज्योती व तिचे वडील भिकाराम वाघमारे यांना ‘प्रकरण मिटवून घ्या, अन्यथा नोकरीला मुकावे लागेल,’ या आशयाच्या धमक्या द्यायला सुरुवात केल्याचे ज्योतीच्या वडिलांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


माझे खूप नुकसान झाले
कंपनी माझ्या पगारातून ईएसआय कापते. त्याची सुविधा मी आजारपणात मागितली होती, पण अनेक वेळा विनंती करून व पत्रे पाठवूनही कंपनीने मला ईएसआयचा क्लेम कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले नाही. उलट मी पाठवलेली मेडिकलच्या बिलांची फाइलही परत पाठवली.
ज्योती वाघमारे, सेल्स अँडव्हायझर, ट्रिम्फ इंटरनॅशनल, शॉपर्स स्टॉप दालन, प्रोझोन मॉल

मी कर्जबाजारी झालो
कंपनीने ईएसआय योजनेचा लाभ घेऊ दिला नाही. दोन वर्षे फक्त झुलवत ठेवले. आज मजबुरीने मुलगी परत नोकरीवर रुजू झाली. भिकाराम वाघमारे, ज्योतीचे वडील