आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Troma Accident Care Building Construction Issue Aurangabad

3 वर्षे झाली तरी ‘ट्रॉमा’चे काम सुरूच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - अपघातातील जखमीला तातडीने उपचार मिळावेत म्हणून शासनाने अजिंठ्यात ट्रॉमा केअरला मंजुरी दिली. याचा कालावधी ६ महिन्यांचा असताना तीन वर्षे होत आली तरी अद्याप काम अर्धवट आहे. कासवगतीने होणा-या या कामाला अजून किती वर्षे लागतील अशा प्रश्न हे काम बघून निर्माण होत आहे.
अजिंठा गाव औरंगाबाद-जळगाव महामार्ग क्र. ८ वर आहे. तसेच जगप्रसिद्ध लेणी असल्याने नेहमी देशी-विदेशी पर्यटकांसह वाहनांचा राबता असतो. रस्त्यावर अपघातही होतात. त्यांना तातडीने उपचार मिळावे म्हणून 2 मार्च 200९ ला येथे ट्रॉमा केअरला मंजुरी मिळाली. ६८.32 लाखांचे हे काम कालावधी उलटल्यावरही अजून अपूर्णावस्थेतच आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांना ९0 कि.मी. अंतरावर औरंगाबाद येथेच न्यावे लागते. अंतरामुळे जास्त वेळ तसेच कालावधीमुळे अनेकांच्या प्राणास धोका निर्माण होतो. अजिंठा येथे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याच्या मोहिमेस सिल्लोड सा.बां. विभागाचे अभियंता गणेश पोहेकर हे आले होते. या कामाबाबत विचारले असता, स्लॅबपर्यंत काम झाले आहे. आता कामाला जास्त वेळ लागणार नाही. लवकर पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले होते.
नाव एकाचे, काम दुस-याचे...- अजिंठा येथे चालू असलेल्या ट्रॉमाचे काम कंत्राटदार म्हणून बोर्डावर रेणुका कन्स्ट्रक्शन, अजिंठा असे आहे. मात्र हे काम सिल्लोडचे ठेकेदार आर.एस. पवार करीत आहेत. यामुळेच कामात पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही.