आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलांसाठी भूसंपादनच नसताना निधीची घोषणा काय कामाची?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाणचक्की, मकई गेट आणि बारापुल्ला येथील तिन्ही पुलांसाठी भूसंपादनच झालेले नाही. त्यामुळे निधी येऊन उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत असून किमान आणखी एक ते दोन वर्षे हे पूल होण्याची शक्यता नसल्याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या तिन्ही पुलांसाठी घोषित केलेले अकरा कोटी रुपयेदेखील प्रत्यक्षात मिळाले नसल्यामुळे पुलांबाबतीत आश्वासनांचाच खेळ सुरू असल्याचे दिसते.
११ एप्रिल २०१२ रोजी तत्कालीन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी या तिन्ही पुलांसंदर्भात विधानसभेत आवाज उठवला होता. खाम नदीवरील हे तिन्ही पूल ३०० वर्षांपेक्षा जुने असल्याने त्यांची वयोमर्यादा संपली असून रहदारीसाठी ते योग्य नसल्यामुळे या गेटच्या शेजारी नवीन पूल बांधण्याची मागणी त्यांनी केली होती. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ते पैसे आलेच नाहीत. पूल बांधण्यासाठी भूसंपादन झालेलेच नाही. निधीच नसल्यामुळे ही प्रकिया रखडल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ११ मे रोजी खरीप आढावा बैठकीनिमित्त शहरात आल्यानंतर पाणचक्कीचा पूल अल्पसंख्याक विभागाकडून बांधण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, रहदारीमुळे नागरिक त्रस्त आणि आमदार आणि माजी आमदारांचे मत...
बातम्या आणखी आहेत...