आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडला ट्रॅक्टर शाळेत घुसले, ३० विद्यार्थी थोडक्यात बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- शहरातील बसस्थानकलगत असलेल्या समर्थनगर येथील सारा प्रायमरी इंग्लिश शाळेत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर कंपाउंडची भिंत तोडून थेट वर्गाला असलेल्या भिंती (पार्टेशन) वर धडकले. भिंतीवर धडकताच ट्रॅक्टर बंद पडले. यामुळे जीवित हानी टळली. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. जेथे ट्रॅक्टर घुसले होते तो पहिलीचा वर्ग होता त्या वर्गात ३० विद्यार्थी होते. या घटनेमुळे विद्यार्थी- शिक्षकांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या अपघाताचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
समर्थनगर भागात पहिली ते सहावीपर्यंत ही शाळा आहे. २८६ विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेचा कारभार दोन इमारतीत चालतो. मुख्य इमारतीशेजारीच दुसरी इमारत शाळेसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. येथे एक संगणक कक्ष, नर्सरी वर्ग, शिक्षक कक्ष आणि पहिलीचा वर्ग चालतो.

पहिलीच्या वर्गात ३० मुले शिक्षण घेतात. शाळेची वेळ सकाळी ८:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. पहिलीचा वर्ग सुरू असताना दुपारी पावणेबाराच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रॅक्टर(एम. एच. ३४-२५२९) ट्रॉलीसह (क्र.एम.एच. २०.ई. ११७६) शाळेचे पत्राचे संरक्षक कंपाउंड तोडून पहिलीच्या वर्गाबाहेरील शटरला धडकले. त्यानंतर ते वर्गखोलीच्या लाकडी पार्टेशनला भिडले. विद्यार्थी या पार्टेशनलगतच आतल्या बाजूने बेंचेसवर बसलेले होते. ट्रॅक्टरच्या धडकेने लाकडी पार्टेशनसह विद्यार्थी पुढे सरकले गेले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी व शिक्षक प्रचंड भयभीत झाले. वर्गाबाहेरील शटरच्या भिंतीमुळे ट्रॅक्टर रोखले गेले. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जर ट्रॅक्टर तेथेच बंद पडले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.
या घटनेची वार्ता शहर व परिसरात कळताच पालकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांनी तत्काळ शाळेेत जाऊन आपआपल्या पाल्याची चौकशी केली. मात्र, विद्यार्थ्यांना कोणतीही इजा न झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. चालकाचा ताबा सुटला व एका घराच्या संरक्षक भिंतीस धडक दिली. त्यानंतर रस्त्यालगत विजेच्या खांबासही धडक देऊन शाळेकडे वळले. याप्रकरणी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वाळू उपसा व वाहतूक बंद असतानाही कशी आहे सुरूच