आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूच्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूजहून औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने (एमएच २० सीटी ६२६७) दोन दुचाकींना ठोकरले. यात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना वाळूजलगतच्या साई पेट्रोल पंपालगत शनिवारी दुपारी वाजेच्या सुमारास घडली. यापूर्वी डिसेंबर रोजी वाळूज येथील एका महिलेसह युवकाचा याच मार्गावर अपघाती मृत्यू झाला असून गेल्या १५ दिवसांत याच मार्गावर अपघाती मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे.ट
विचित्र अपघात
वाळूची वाहतूक करणारा हायवा ट्रक शनिवारी दुपार च्या सुमारास वाळूजमार्गे औरंगाबादकडे भरधाव जात होता. साई पेट्रोल पंपासमोर या ट्रकने सागर शिंदे (रा. २४, रा. बकवालनगर, वाळूज) यांची दुचाकी (एमएच २० डिजे २५५१) आणि भागचंद बोरुडे (५०, रा. पद्मपुरा, टेंभापुरीलगत) यांच्या एमएच २० सीएक्स ५५०३ क्रमांकाच्या दुचाकीला मागून धडक दिली. प्रथम ट्रकची सागर शिंदेच्या दुचाकीला नंतर बोरुडेेंच्या दुचाकीला जोराची धडक दिली. सागर शिंदेची दुचाकी ट्रकखाली सापडली.तर बोरुडे यांची दुचाकी दूरवर फेकली गेली. या विचित्र अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींसह पोलिसांनी दिली.

अशी अपघातांची शृंखला
२१ नोव्हेंबर रोजी अतुल अल्हाट (३४) यांच्या दुचाकीला साई पेट्रोल पंपालगत अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात त्यांचा उपचारदरम्यान डिसेंबर रोजी मृत्यू झाला. डिसेंबर दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याने गंगा कॉलनी वाळूज येथे राहणाऱ्या मनीषा विठ्ठल रोडे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती विठ्ठल मुलगी जखमी झाली. गेल्या महिन्यांपूर्वी याच मार्गावर अपघातात जखमी झालेली पूजा प्रकाश भोसले (१८) एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

महामार्ग धोकादायक
औरंगाबाद-नगर महामार्गावरील अपघातांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भरधाव वाहनांच्या धडकेत अनेक जण जखमी झाले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले तर अनेकांना प्राणालाही मुकावे लागले. मागील १० दिवसांत वाळूज परिसरात जणांना प्राण गमवावा लागला, या मार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटनांना कसा निर्बंध घालावा हा गंभीर विषय बनला आहे.
बातम्या आणखी आहेत...