आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रकवर आदळली बस, १२ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर - औरंगाबादकडे जाणारी बस (एमएच १४ बीटी १४२९) समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रकवर आदळली. ही घटना औरंगाबाद - धुळे महामार्गावर हतनूर शिवारात शनिवारी घडली. या अपघातात १२ जण जखमी झाले.

लहुदास सोनवणे (५६, वासडी), लक्ष्मण घुगे (७०, सोनखेडा), मुक्तारखान वजीरखान (७०, कन्नड), सुनीता गोरे (५०, भांबरवाडी तांडा), सुलतान शेख रशीद (५०, औरंगाबाद), नसीम अय्युब शेख (५५, अंबा), खातुनाबी मुस्ताक शे. (६०, अंबा), मीरा जाधव (४०, शेरुडी), वंदना निकम (३०, औरंगाबाद), सविता निकम (३५), बबन निकम (४०), नामदेव बनकर (५०, सरई) अशी जखमींची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...