आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड नजीक ट्रक-बसचा अपघात; १७ प्रवासी जखमी, चार गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त बसची अशी अवस्था झाली होती. छाया : सुरेश केवट - Divya Marathi
अपघातग्रस्त बसची अशी अवस्था झाली होती. छाया : सुरेश केवट
कन्नड- भरधाव ट्रक-बसच्या भीषण अपघातात १७ प्रवासी जखमी झाले असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर कन्नड शहरानजीकच्या तेलवाडीजवळ रविवारी (दि. १९) पहाटे ५.४५ च्या सुमारास ही भीषण घटना घडली. गंभीर जखमींवर औरंगाबाद शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहेत.

विद्या संजयकुमार सोनवणे (४०), हर्षल संजयकुमार सोनवणे, युवराज माळी (४०), गोविंद जाधव (६५), पुष्पा माळी(४०, सर्व रा.कन्नड), रवींद्र चव्हाण (५२, रा. पुणे), वसंत बनलल (५०, रा. तळेगाव दाभाडे, पुणे),आशा माळी(३२),ललित पवार (३३, रा.औरंगाबाद), बसचालक प्रदीप पाटील, वाहक शंकर खतगावे असे एकूण १७ जण जखमी झाले आहेत. तर या पैकी खलील पिंजारी(२८, कन्नड), बसचालक प्रदीप पाटील, ट्रकचालक अतुल मनोहरलाल विरभी (रा. पंजाब), दिलीप ठाकूर(४५, रा.अमळनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर कन्नड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले असून गंभीर जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत. नवापूर आगाराची बस(एमएच १४ बीटी २७११) औरंगाबादहून कन्नडमार्गे नवापूरकडे जात होती. तर चाळीसगावहून ट्रक(एचआर ५५ के ८२३९) कन्नडकडे येत होता. दरम्यान, कन्नड शहरानजीक असलेल्या तेलवाडी गावाजवळ रविवारी पहाटे ५.४५ च्या सुमारास दोन्ही वाहनांत धडक झाली. अपघातात बसचालक-वाहकांसह १७ जखमी झाले. त्यापैकी चार जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना प्रथमोपचार करून औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कन्नड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रोहित बेंबरे, दीपेश नागझरे, योगेश ताठे, मयूर पाटील आदींनी घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी हलवले.
आगाराचे अधिकारी फिरकले दोन तासांनंतर
अपघात घडल्यानंतर कन्नड आगाराचे अधिकारी वेळीच घटनास्थळी पोहोचणे आवश्यक होते. परंतु कन्नड शहरापासून अपघाताचे ठिकाण अवघ्या पाच ते दहा मिनिटांवर असताना कन्नड आगाराचे अधिकारी तब्बल दोन तासांनी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...