आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: बीड बायपासवर पुन्हा 2 बळी; दुचाकीवरील पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातस्थळाचे दृश्य. ठार झालेले पती-पत्नी. - Divya Marathi
अपघातस्थळाचे दृश्य. ठार झालेले पती-पत्नी.
औरंगाबाद - बीडबायपास रोडवरील गुरुप्रसाद लॉनसमोर, बाळापूर फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत नारेगाव परिसरातील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. संतोष साहेबराव मानकर (३५ मूळ रा. पांगरी गोसावी, ता. मंठा, जि. जालना), आशा (३०) अशी त्यांची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी ट्रकचालक वाहीद खान (३५ रा. वापी जि. बलसार गुजरात) आणि अल्पवयीन क्लीनरला अटक केली.
 
संतोष आणि आशा यांना एक आठ वर्षांची मुलगी आहे. अजून एका अपत्य प्राप्तीसाठी ते कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जात होते. संतोष वाळूजला एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होते. तर आशा गृहिणी होत्या. त्यांची मुलगी रूपाली इयत्ता चौथीत शिकते.
 
मंगळवारी सकाळी हे दांपत्य मुकुंदवाडी मार्गे बीड बायपास रोडवरून कमलनयनला जात होते. गुरूप्रसाद लॉन्स समोरून बीड बायपासवर संतोष यांची दुचाकी (एम एच २० बीके ९२४८) येताच बीडकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (जीजे १५ एक्स ८७६०) त्यांना उडविले. धडक इतकी जोरदार होती की, आशा दुचाकीवरून खाली फेकल्या गेल्या आणि संतोष १५ फूट फरपटत नेले. त्याच्या डोक्यावरील हेल्मेटचे तुकडे झाले. आणि ट्रकच्या समोरील डाव्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
जवाहरनगर पोलिस ठाण्याची पीसीआर व्हॅन घटनास्थळी पोहोचेपर्यंत ट्रकचालक क्लीनर पळाले होते. पोलिस कर्मचारी रमेश हिवाळे, सुनील भावले, अशोक खामकर तसेच १०८ अॅम्ब्युलन्सचे डॉ. गौरव शेळके, फईम खान यांनी मानकर दांपत्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस उपायु्क्त संदीप आटोळे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक सिद्दीकी त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
 
मृतदेह तीन तास रुग्णवाहिकेतच : १०८ रुग्णवाहिकेने मानकर दांपत्याला घाटीत आणले. सीएमओंनी त्यांना रुग्णवाहिकेतच तपासून मृत घोषित केले. त्यानंतर दुसरा कॉल आल्याने रुग्णवाहिका घेऊन चालकाला जायचे होते. त्याने तशी माहिती डॉक्टरांना देऊनही तास मृतदेह खाली उतरवून घेतले नाही. घटनास्थळ नेमके कोणत्या ठाण्याच्या हद्दीत येते हा संभ्रम दूर करण्यासाठी वेळ लागल्याचे सांगण्यात आले.
 
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले ते असे
मुकुंदवाडीरेल्वे रूळ ओलांडल्यानंतर राजनगरमधून येणारा रस्ता बीड बायपासकडे येतो. पैठणरोड म्हणजे कमलनयन बजाज हॉस्पिटल किंवा महानुभाव आश्रमाच्या दिशेने जाण्यासाठी डाव्या हाताला गाडी वळून ज्या ठिकाणी दुभाजकांत अंतर आहे. तेथून यूटर्न घेण्याची सोय आहे. मात्र, उजव्या हाताला वळण घेतल्यावर दुभाजक फोडण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून केवळ दुचाकी निघू शकते. यूटर्न घेण्यासाठी मोठे अंतर पार करण्यापेक्षा थोडे राँगसाइड गेल्यानंतर पैठणरोडकडे जाता येते. बहुतांश दुचाकीस्वार हाच मार्ग वापरतात. मात्र बीड बायपासकडे येणारे ट्रक भरधाव वेगात असतात. शिवाय मध्य भागातून चालतात. त्यामुळे एखादी दुचाकी मध्ये असल्यास अपघात होतो. या प्रकरणातही हाच प्रकार झाला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक वाचा,
- माझे मम्मी-पप्पा कुठेत? चिमुकलीचा प्रश्‍न...
- मागील तीन महिन्यांत दोन चिमुकल्या, एका विद्यार्थिनीचा बायपासने घेतला बळी
- अपघाताचे भिषणता दर्शविणारे फोटोज..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...