आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आडूळ- औरंगाबादहून माजलगावकडे निघालेल्या इंडिगोला (एमएच - 44 डी - 999) ट्रकने (जीजे-23-टी-9000) पाचोड परिसरातील रजापूरच्या वळणावर धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर दोन मुली जखमी झाल्या. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. माजलगाव शहरातील मराठा बिअर बारचे मालक बापूराव महादू कदम आणि त्यांचा मित्र सय्यद आसेफ यांचा अपघातात मृत्यू झाला. याच अपघातात गाडीमधील अन्य दोन मुली वर्षा बापूराव कदम आणि पूनम बापूराव कदम जखमी झाल्या असून त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलवले आहे. या प्रकरणी पाचोड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस निरीक्षक डी. जी. चिखलीकर तपास करत आहेत. कदम हे माजलगावचे नगरसेवक कल्याणराव कदम यांचे बंधू आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.