आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड तालुक्यातील हतनूर येथे स्कॉर्पिओ-ट्रक धडकेत सहा ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - सोलापूर-धुळे महामार्गावर हतनूर (ता. कन्नड) पोलिस चौकीजवळ रविवारी पहाटे स्कॉर्पिओ-ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यात स्कॉर्पिओतील सहा जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले.

अंधानेरचे ग्रामस्थ गोव्याहून उपचार घेऊन रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्कॉर्पिओने (एमएच २० बीएन ४०५५) परतत होते. तिला कन्नडहून औरंगाबादकडे जाणार्‍या आयशर ट्रकची (एमएच ०४ ईएल १२३०) धडक झाली. यात शेख शब्बीर शेख नसीर (४०), नजमाबी शेख इसाक (६०), हकीम शेख रफिक (४५), मुमताजबी शेख नसीर (६०), सानिया रफिक शेख (२ वर्षे, सर्व रा. अंधानेर, ता. कन्नड) व स्कॉर्पिओचालक अफरोज खान सांडू खान (३५, पांढरी मोहल्ला, कन्नड) हे जागीच ठार झाले.

जखमींमध्ये रिझवानाबी शेख मुसा (६०), डॉ. शेख जावेद मुसा (३२) व शेख मुसा शेख इसाक (३५, सर्व रा. अंधानेर) यांचा समावेश असून त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.