आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न समारंभाला जाताना काळाचा घाला, खडीच्या ट्रकने 22 वर्षीय महिलेला चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीना मालोदे. - Divya Marathi
मीना मालोदे.
औरंगाबाद हतनूर- बीड बायपास रोडवरील लॉनवर आयोजित लग्न समारंभासाठी आलेल्या विवाहितेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मिनाज चौकात घडली. खडीच्या ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मीना अमोल मालोदे (२२, रा. हतनूर, ता. कन्नड) असे ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सातारा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेख कय्युम शेख मेहबूब (५०, रा. गारखेडा) असे ट्रकचालकाचे नाव आहे.
कन्नड तालुक्यातील हतनूर येथील शेतकरी अशोक गंगाधर मालोदे यांचा मुलगा अमोल याच्याशी दीड वर्षापूर्वी मीनाचे लग्न झाले होते. सोमवारी (दि. २२) दुपारी शहरातील हिवाळे लॉन्स येथे मीनाच्या नणंदोईच्या भावाचे लग्न होते. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मीना सासरे अशोक मालोदेंसोबत दुचाकीवर (एमएच २० बीडी २९६७) हतनूरहून शहरात आली होती. सकाळी ११.३० च्या सुमारास महानुभाव आश्रमाकडून पटेल लॉन्सच्या रस्त्याने हे दोघे विवाह स्थळाकडे जात असताना मिनाज चौकात खडी भरलेल्या भरधाव ट्रकने (एमएच २० बीटी ४१००) मालोदे यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. यात मागे बसलेली मीना रस्त्यावर कोसळली आणि क्षणार्धात ट्रकचे मागचे चाक तिच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे मीना जागीच ठार झाली. दरम्यान, ही घटना बघणारे सामाजिक कार्यकर्ते सलीम पठाण यांनी घटनेची माहिती सातारा पोलिस ठाण्याला दिली. पोलिस ठाण्याच्या टू मोबाइलचे कर्मचारी सहायक फौजदार शेख, जमादार ए.ए. मरकड, अर्जुन पवार डी.आर. टाकळकर यांनी घटनास्थळी धाव घेत मीनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवला. अपघात घडताच चालक ट्रक सोडून पसार झाला. सातारा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रमसिंग चव्हाण करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर वचा, सासूला आराम मिळावा म्हणून बसने पाठवले...