आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला रुग्णालयात नेताना ट्रकने टेम्पाेसह दुचाकीला उडवले; 7 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- चाळीसगाव तालुक्यातील बाेढरे येथील एका १७ वर्षीय मुलाची प्रकृती साेमवारी रात्री १२.३० वाजता बिघडली. त्याला चाळीसगाव येथे उपचारासाठी नेताना त्यांच्या टेम्पाेसह दुचाकीवरील दोघांना अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले. यात एकाच कुटुंबातील ६ जणांसह टेम्पाेचालक ठार झाला. चाळीसगाव ते अाैरंगाबाद रस्त्यावरील रांजणगाव फाट्याजवळ मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला.    नामदेव नरसिंग चव्हाण (४२), शीला नामदेव चव्हाण (३५), राजेंद्र गलसिंग चव्हाण (४२), पंडित बाबू जाधव, चालक (५५), मिथुन रुमदेव चव्हाण (२५), मितेश नामदेव चव्हाण (१६), शुभम तुकाराम चव्हाण (१७, सर्व जण राहणार, बाेढरे) अशी मृतांची नावे आहेत.  

बाेढरे येथील मितेश नामदेव चव्हाण या मुलाची प्रकृती साेमवारी मध्यरात्री १ वाजता बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तत्काळ उपचारासाठी चाळीसगावला नेण्याचे ठरवले. गावातील पंडित जाधव यांच्या टेम्पाेने (एमएच १३ एझेड २७६१) त्याला घेऊन चव्हाण कुटुंबातील पाच जण निघाले. रुग्ण मितेशसाेबत टेम्पोत त्याची आई शीला चव्हाण, वडील नामदेव चव्हाण यांचे पुतणे मिथुन, शुभम, मयूर, भावजय गीताबाई हे होते. मितेशचे वडील नामदेव चव्हाण व भाऊ राजेंद्र चव्हाण हे पाठीमागून दुचाकीवर (एमएच २० एके २८०५) येत हाेते. या वेळी चाळीसगाव ते अाैरंगाबाद रस्त्यावरील रांजणगाव फाट्याजवळ धुळे येथून येणारा श्रीराम ट्रान्सपाेर्टच्या अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने टेम्पाेसह दुचाकीला समाेरून उडवले. यात सातही जण  जागीच ठार झाले, तर गीताबाई रुमदेव चव्हाण व मयूर नामदेव चव्हाण हे जखमी झाले. त्यातील गीताबाई या गंभीर जखमी अाहेत. त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.  मयूरवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांत टेम्पाेतील पाच व दुचाकीवरील दाेघांचा समावेश अाहे.

अपघातानंतर टेम्पाे तिनदा उलटला, ट्रकचा चुराडा
अपघात एवढा भीषण हाेता की, टेम्पाे तीन वेळा उलटला हाेता. ट्रकच्या केबिनचाही खुर्दा झाला. टेम्पाेचालकासह पाच व दुचाकीवरील दाेन असे ७ जण ठार झाले. ट्रकचालकासह अन्य दाेन जण जखमी झाले अाहेत. धनत्रयाेदशीच्या पूर्वसंध्येला चव्हाण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण बाेढरे गाव सुन्न झाले हाेते. मृत कुटुंबातील सर्व सदस्य हे शेतीकाम करून उदरनिर्वाह करायचे.  

मिथुनचे इंजिनिअर हाेण्याचे स्वप्न राहिले अधुरे  
अपघातात ठार झालेला मिथुन चव्हाण, शुभम चव्हाण हे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत हाेते. दिवाळीनिमित्त सुटी असल्याने ते दाेन दिवसांपूर्वीच बाेढरे येथे घरी अाले हाेते. जखमी मयूर हासुद्धा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत अाहे. मिथुन व शुभम चव्हाणवर काळाने घाला घातल्याने त्यांचे इंजिनिअर हाेण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

गावात पेटली नाही चूल  
बाेढरे हे गाव चाळीसगाव शहरापासून १० किलाेमीटर अंतरावर कन्नड घाटाच्या पायथ्याशी वसलेले अाहेे. बंजारा समाजबहुल वस्ती येथे अाहे. साेमवारी घडलेल्या घटनेने येथे दिवसभर कुणाच्याही घरची चूल पेटली नाही. घाटाजवळ अपघात झाल्याचा अावाज झाला. त्यानंतर अर्ध्या तासात परिसरातील हाॅटेलचे चार कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी वाहने थांबवून मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच पाेलिस पथकही पाेहाेचले.  
बातम्या आणखी आहेत...