आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपासवरील अवजड वाहतूक मंगळवारपासून बंद; सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणही काढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीड बायपासवरील अवजड वाहतूक उद्यापासून (मंगळवार, 18 एप्रिल) बंद करण्याचा करण्‍यात येणार आहे. या मार्गावरील अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधीची अधिसुचना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

सकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान बीड बायपासवरील ट्रक वाहतुकीस बंदी ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून होणाऱ्या ट्रक वाहतुकीस पैठण-पाचोड, सावंगी-फुलंब्री-खुलताबाद असा पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. 7 दिवस प्रायोगिक तत्वावर ही वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 
 
मनपा बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढणार, मार्किंगला सुरूवात 
जळगाव रोडवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत, अशी तक्रार सभागृह नेते गजानन मनगटे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. त्यानंतर या रोडवर दोन मोठे अपघात झाले. त्यामुळे आता मनपा प्रशासनाने लगेचच सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवण्याची तयारी सुरू केली असून बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमने हटवण्यासाठी सोमवारी मार्किंग करण्यात येत आहे.

महापौर भगवान घडामोडे यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून प्रशासनाने येथील अतिक्रमणे हटवावीत. रस्ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद अंदाजपत्रकातच केली जाईल, असे घडामोडे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे या रस्त्यावरील अपघातांची आम्हाला कल्पना असून सोमवारपासूनच आम्ही तेथे पोहोचू, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी म्हटले होते. त्यानुसार आज (सोमवार) मार्किंगला सुरूवात झाली आहे.
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...