आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Truck Travels Accident In Valuja, Passengers Injured

वाळूजमध्ये ट्रक-ट्रॅव्हल्सचा अपघात; प्रवासी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- नगर महामार्गावरील एएस. क्लबलगतच्या चौकात ट्रक-ट्रव्हल्सचा अपघात झाला. यात जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री २.४० वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईहून भंगार घेऊन एक ट्रक (एमएच ०४ एफसी २३६२) जालन्याच्या दिशेने निघाला होता, तर अकोला येथून श्री गणेश स्लीपर कोच ट्रॅव्हल्स (एमएच २३ डब्ल्यू २२८८) पुण्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी पहाटे लिंकरोडमार्गे निघालेला ट्रक ए. एस. क्लब चौकातून भरधाव जात होता. त्याच वेळी ट्रॅव्हल्स ट्रकच्या डाव्या बाजूस जोरदार धडकली. त्यात ट्रकचालक सुरेंद्रकुमार चौधरी, क्लीनर सुमीत ज्वालाप्रसाद उपाध्याय हलीम अहमद यांच्यासह ट्रॅव्हल्सचा चालक अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले. या चौकातील वाढत्या अपघातांमुळे वाहनचालकांकडून ओव्हरब्रिज तसेच चौकाच्या चारही बाजूने जवळपास ३०० फुटांवर गतिरोधक बसवण्याची मागणी करत आहेत.