आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Person Killed In Trucks Motorbike Accident At Verul

वेरूळ येथे झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दोन जण जागीच ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - सोलापूर-धुळे महामार्गावरील वेरूळ बायपासवर ट्रक-दुचाकीतील अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. विलास शामराव दळवी (21) व धनराज गुलाब पवार (30) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.


नांदगाव तालुक्यातील आठतांडा (पिंपळखेड) येथील विलास शामराव दळवी व धनराज गुलाब पवार हे दोघे कसाबखेड्याहून पाचपीरवाडीकडे दुचाकी (एमएच 20 सीडी 1302) वर जात होते. समोरून येणार्‍ या ट्रकने (पीएन 20 एआय 9847) त्यांना जोराची धडक दिली. याप्रकरणी खुलताबाद ठाण्यात नोंद झाली आहे.


एक ठार, एक जखमी
कन्नड - औरंगाबाद रस्त्यावरील अंधारवडाजवळ ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेचार वाजता घडला. अनिल पुंजाबा सातदिवे (42, चापानेर ) असे मृताचे नाव आहे, तर सचिन भाऊसाहेब दरेकर (26, रा.चापानेर) गंभीर जखमीचे नाव आहे.