आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाई संयुक्त नगर परिषदेच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातार्‍यासह देवळाईचा समावेश असलेली नगर परिषद अस्तित्वात यावी यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. संयुक्त नगर परिषद झाल्यास कसे चित्र असेल, तेथील लोकसंख्या, अकृषक रोजगार तसेच नकाशा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिले.

प्रशासनाकडून फक्त सातारा नगर परिषदेबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. तो शासनाकडे पाठवण्यापूर्वीच त्यात देवळाईचा समावेश करावा, अशी मागणी देवळाईचे सरपंच करीम पटेल यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन शासनाकडे केली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागली. पुढे जिल्हा परिषदेच्या सातारा सर्कलची आचारसंहिता जारी झाली. या करणांमुळे विलंब होत असला तरी यापुढे ही नगर परिषद दोन गावांच्या समावेशासह व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी सातारा व देवळाईची 2001 व 2011 ची लोकसंख्या, दोघांची मिळून होणारी लोकसंख्या, या भागात अकृषक जमिनीचा वापर, अकृषक रोजगारी, सातार्‍याचे वेगळे व देवळाईसह होणारे क्षेत्रफळ, अकृषक भागाची माहिती मागवली आहे.